वृत्तसंस्था :
गुगलच्या ऑनलाईन क्लाऊड स्टोरेज पॉलिसीत १ जून २०२१ पासून मोठा बदल होणार आहे. गुगलच्या नव्या पॉलिसीनुसार आता यूजर्सना फोटो अॅपवर १५ जीबीपेक्षा जास्त डेटा अपलोड करण्यासाठी १ जून २०२१ पासून शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे या तारखेपासून यूजर्सना मोफत अमर्यादित स्टोरेजची सोय मिळणार नाही. इतकेच नाही, तर गुगलने आता निष्क्रीय खात्यांचे कंटेंट काढून टाकण्यासही सुरुवात केली आहे. इथे आम्ही गुगल स्टोरेज पॉलिसी आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांबद्दल माहिती देणार आहोत.
*गुगलची सध्याची पॉलिसी काय आहे?*
सध्या गुगल एका नियमित खात्याच्या उपयोगकर्त्याला १५ जीबीचे स्टोरेज मोफत देतो. हे मायक्रोसॉफ्टच्या तुलनेत खूप जास्त आहे जे वनड्राईव्हवर फक्त ५ जीबीचे स्टोरेज देतो आणि अॅपलच्या आयक्लाऊडवरही ५ जीबीचे स्टोरेज आहे. गुगलचे हे १५ जीबीचे स्टोरेज यूजर्सना जीमेल, ड्राईव्ह आणि फोटोजसाठी देते. ड्राईव्हमध्ये सर्व फाईल्स, स्प्रेडशीट इत्यादी समाविष्ट आहेत ज्यात गुगलचे अॅप्स उदाहरणार्थ गुगल डॉक्स, गुगल शीट्स इत्यादींच्या मदतीने बनवले जातात. मात्र गुगल फोटो अॅपवर अपलोड करण्यात आलेल्या फोटोंची गणती या रिकाम्या जागी होत नाही. हे सर्व हाय रेझोल्यूशन फोटो आणि व्हिडिओ आणि एक्सप्रेस रेझोल्यूशन फोटो आणि व्हिडिओवर लागू होतं. गुगलच्या व्याख्येनुसार जेव्हा आपण हाय रेझोल्यूशनवर फोटो अपलोड करता तेव्हा स्पेस वाचवण्यासाठी ते फोटो काँप्रेस होतात.
*का घेतला गुगलने असा निर्णय?*
हा निर्णय आश्चर्यकारक नाही, कारण गुगलने आपल्या प्रत्येक उत्पादनासाठी १ बिलियनपेक्षा जास्त यूजर्सना पाहता हा बदल करत आहे. गुगलने दिलेल्या माहितीनुसार इतके मोफत क्लाऊड स्टोरेज प्रदान करणे शक्य नाही. गुगलने एका ब्लॉगपोस्टमध्ये सांगितले आहे की लोक आधीच्या तुलनेत खूप जास्त सामग्री अपलोड करत आहेत. जीमेल, ड्राईव्ह आणि फोटोंमध्ये दर दिवशी ४.३ जीबीपेक्षा जास्त डेटा जोडला जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की वाढत्या मागणीशी ताळमेळ जमवण्यासाठी हा बदल करणे गरजेचे आहे.