You are currently viewing आमदार वैभव नाईक यांनी शाळेसाठी निधी देऊनही बांधकामासाठी विलंब!

आमदार वैभव नाईक यांनी शाळेसाठी निधी देऊनही बांधकामासाठी विलंब!

आमदार वैभव नाईक यांनी शाळेसाठी निधी देऊनही बांधकामासाठी विलंब!

पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच प्रशासन झाले खडबडुन जागे!

गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी दीली शाळेला भेट!

कुडाळ

हुमरमळा वालावल रामेश्वर विद्या मंदिर शाळा दुरुस्तीसाठी आमदार वैभव नाईक यांनी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करुनही काम सुरू करण्यासंदर्भात प्रशासन चालढकल पणा करत असल्याचा आरोप पालकांनी करुन शाळेच्या विद्यार्थ्यांना पंचायत समिती कार्यालयात आणुन बसवु असा पवित्रा घेताच आज गटविकास अधिकारी धनंजय जगताप आणि गटशिक्षणाधिकारी श्री किंजवडेकर यांनी पालकांची भेट घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिली,
हुमरमळा वालावल श्री रामेश्वर विद्या मंदिर शाळा नादुरुस्त झाल्याने नविन वर्गखोल्या आमदार वैभव नाईक यांनी मंजुर करुन जवळपास आठ महीने होऊन शाळा निर्लेखन प्रस्ताव धूळखात खात बसला असे असताना या इमारतीत मुले बसविणे धोकादायक झाल्याने एका खाजगी इमारतीमध्ये मुले बसविली जात होती परंतु पालकांना ही जागा गैरसोयीची होत होती म्हणून माजी पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे, सरपंच श्री अमृत देसाई, ग्रामपंचायत सदस्य श्री मितेश वालावलकर यांच्या पुढाकाराने पालकांनी आंदोलनाचा इशारा देताच प्रशासन खडबडुन जागे झाले तत्पूर्वी पालकांच्या बैठकीत मुले शाळेचे बांधकाम सुरू होईपर्यंत याच इमारतीत बसवावी असा निर्णय घेतला होता तरीही पालकांनी शाळेच्या बाजुला असलेल्या सभामंडपात सुस्थितीत मजबुत बंदीस्थ जागा विद्यार्थी बसण्यासाठी केल्याने गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांनी पालकांचे कौतुक केले व निर्लेखन आणि काम सुरू होण्यासाठी त्वरित कारवाई करु असे आश्वासन दीले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे, सरपंच श्री अमृत देसाई, गटशिक्षणाधिकारी श्री किंजवडेकर, केंद्र प्रमुख श्री तांबे, ग्रामसेवक अपर्णा पाटील, मुख्याध्यापक श्रीम फणसेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री मितेश वालावलकर, युवा सेना शाखा प्रमुख संदेश जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री शरद वालावलकर, रुपेश मार्गी, कैलास मार्गी, सागर पवार, विस्तार अधिकारी श्री राठोड, अंगणवाडी सेविका मिताली देसाई, निलेश परब, आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा