You are currently viewing मनाचे सौदर्य

मनाचे सौदर्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री डॉ. दक्षा पंडित लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मनाचे सौदर्य*

*षडाक्षरी*

 

 

मनाचे सौंदर्य

आहे सर्वोत्तम

तयाची श्रीमंती

असे महत्तम……१

 

शरिर सौंदर्य

नाही चिरकाल

मनाचे सौंदर्य

असते त्रिकाल……२

 

मन सौंदर्याने

झळाळेल कांती

माया,स्नेह देता

मिळतसे शांती……३

 

करूणा,ममता

झरे ह्रदयात

मना समाधान

वसे अंतरात……४

 

मनाचे सौंदर्य

गवसेल सुख

षडरिपू संग

जीवनात दु:ख……५

 

शरिर सौंदर्य

वय हाच कोप

मनाचे सौंदर्य

होणे नाही लोप……६

 

मन सौंदर्याने

लोका आकर्षित

त्यांच्यात तुमचे

स्थान अबाधित……७

 

देवाचा निवास

मन सौंदर्यात

डोईवरी हात

जीणं ऐश्वर्यात……८

 

डॉ दक्षा पंडित

दादर,मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा