You are currently viewing शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गैरसोई दूर करून चांगली रुग्णसेवा द्यावी.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गैरसोई दूर करून चांगली रुग्णसेवा द्यावी.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गैरसोई दूर करून चांगली रुग्णसेवा द्यावी.

डीन आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचना.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

सिंधुनगरी : प्रतिनिधी

सिंधुनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अनेक गैरसोयी असून त्या गैरसोळी दूर कराव्यात यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जोशी यांची भेट घेत या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर चांगले उपचार चांगली रुग्ण सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
जिल्हा रुग्णालयातील दोन्ही लिफ्ट बंद असल्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर अस्थिव्यंग उपचाराची मशीन गेले काही महिने बंद असल्यामुळे रुग्णांना कणकवली गाठावी लागते यासाठी निधीची तरतूद केलेली आहे,वैद्यकीय साहित्य पुरवठा करणाऱ्या प्राधिकरण कडे याबाबत पाठपुरावा करून सदरची मशीन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले.डायलिसिस मशीन अधिक संख्येने उपलब्ध करून देण्यासंबंधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मा खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या माध्यमातून तातडीने प्रयत्न केले जातील ग्वाही प्रभाकर सावंत यांनी यावेळी दिली. शवागरातील मशीन दुरुस्ती संदर्भात सूचना केल्या.तसेच कंत्राटी भरती पारदर्शक होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न झाले पाहिजेत अशी ताकीद त्यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे आता सर्व अधिकार आले असून जिल्हा रुग्णालयाचे अधिकार कमी झाले आहेत मात्र त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होऊ नये याची दक्षता घ्यावी असाही सूचना यावेळी देण्यात आल्या.
गेले काही दिवस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवेवर परिणाम झाला होता. याबाबत अनेक रुग्णांच्या तक्रारी होत्या. येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या सुप्रियाताई वालावकर यांनी याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींचे लक्ष वेधले होते. या याबाबत भाजप पक्षाने ही गंभीर दखल घेत तातडीने भेट घेतली. येथील प्रश्नाबाबत चर्चा केली. जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई,कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, अनिलकुमार देसाई सुप्रिया ताई वालावलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया*

🌈❄️💥🌈❄️💥🌈❄️💥
टाटा मोटर्स प्रथमच जाहीर करीत आहेत
टाटा पंच 👊🏻 पेट्रोल आणि सीएनजी वर
*तगडी सेलिब्रेशन ऑफर*
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

*₹.१५०००/- पर्यंत ची विषेश सुट*

२० लाख एसयुवी आनंदी कुटुंब प्रीत्यर्थ सेलिब्रेशन ऑफर

सर्व श्रेणीं मध्ये देशाची सर्वात अधिक विकली जाणारी कार टाटा पंच लॉंच पासुन प्रथमच तगडया ॲाफर सहीत

👊🏻 ५ स्टार सेफ्टी रेटींग ने परिपूर्ण
👊🏻 सर्वोत्तम बिल्ड क्वॉलिटी
👊🏻 सर्वाधिक सेफ मेटल बॉडी
👊🏻 सर्वोत्तम माइलेज
👊🏻 कमीत कमी मेंटेनंस खर्च
👊🏻 सर्वात जास्त सुरक्षित

सर्व काही एकाच कार मध्ये
ते देखिल तगडया ॲाफर सहीत

*ॲाफर केवळ ३१ जुलै पर्यंत हजर स्टॉक वर वैध*

त्वरा करा..!!
शेवटचे ५ दिवस
आजच भेट दया अथवा कॅाल करा

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली । ओरोस
*7377959595*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा