You are currently viewing ऋतू पावसाळी

ऋतू पावसाळी

*जागतिक साहित्यकाला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणेचे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ऋतू पावसाळी*

***************

पाऊस हा प्रीतभावनांचा

उत्तेजित करी मनामनाला

ऋतुगंधला हा चिंबचिंबला

जागवितो अंतरी प्रतिभेला….

 

उमलता भावप्रीती हळवी

स्पर्श स्पंदनी मृदगंधलेला

येताच पूर शब्दभावनांचा

उधाण येते प्रीतसागराला….

 

लुभावता गाज ती एकांती

लाभते शांती नभांगणाला

मन्मनी तृप्तता काव्यात्मा

बिलगते शब्दुली भावनेला….

 

प्रसवते मुक्त एकेक कविता

जाणुनिया सत्य दृष्टांताला

हा ऋतू फुलारू बरसणारा

फुलवितो अंतरी , प्रतिभेला….

***********************

*रचना क्र.१५४

*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी)*

*📞 ( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा