मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता, दरवर्षाप्रमाणे नाना चौक,अग्निशमनदल येथून गवालिया टॅंक, ऑगस्ट क्रांती मैदानावरील हुतात्मा स्मारकापर्यंत हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गिरणी कामगारांची मूक मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते मूक मिरवणुकीचे नेतृत्व करतील. मूक मिरवणुकीत अन्य उद्योगातील कामगार कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील. रामिमसंघाच्या वतीने गेली ७५ वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. सघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड, उत्तम गिते, सुनिल अहिर, मिलिंद तांबडे, संजय कदम, विजय काळोखे,किशोर रहाटे, साई निकम आदी पदाधिकारी मोर्चाच्या संयोजनात सहभागी होतील. संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार सचिनभाऊ अहिर सरचिटणीस गोविंदराव मोहिते ऑगस्ट क्रांती मैदानावरील हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून अभिवादन करतील, असे प्रसिद्धी प्रमुख काशिनाथ माटल यांनी कळवले आहे.