You are currently viewing *जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनी दिल्या बाबुराव धुरी यांना शुभेच्छा

*जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनी दिल्या बाबुराव धुरी यांना शुभेच्छा

*जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनी दिल्या बाबुराव धुरी यांना शुभेच्छा*

*जनतेच्या सुखदुःखात समरस असलेला कार्यकर्ता…*

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यावर शिवसेना जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी बाबुराव धुरी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी त्यांच्यासोबत माजगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आबा सावंत तसेच दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
बाबुराव धुरी हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. प्रशासकीय अभ्यास त्यांना आहे. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखाशी ते समरस असतात. त्यांच्याकडे उत्कृष्ट संघटन कौशल्य आहे. सावंतवाडी दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ या चार तालुक्यांची जिल्हाप्रमुख म्हणून धुरी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. आपल्या पदाला ते निश्चित न्याय देतील, असा विश्वास बाळा गावडे यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा