सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाचा जेव्हा विषय येतो तेव्हा राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून विधानपरिषदेचे माजी आमदार राजन तेली यांच्याकडे पाहिले जाते. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे ९० च्या दशकात जिल्ह्यात आले तेव्हापासून राजन तेली आणि परशुराम उपरकर दोघेही त्यांचे डावे उजवे हात म्हणून ओळखले जात होते. त्याचेच फळ म्हणजे जेव्हा विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस कडे मताधिक्य नव्हतं त्यावेळेस नारायण राणेंनी चमत्कार केल्याने राजन तेली यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली आणि राज्याच्या राजकारणात राजन तेली यांची “आमदार” म्हणून ओळख झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजन तेली यांचे अनेकांशी सलोख्याचे संबंध, त्यामुळे तेली यांच्याकडे आपली कामे घेऊन येणाऱ्यांची संख्या देखील बरीच आहे. दिलेला शब्द पाळणार आणि काम करणार याची खात्री असल्याने राजन तेली अनेकांना जवळचे वाटतात. पक्षाचे चौथ्या फळीतील कार्यकर्ते, नेते राजन तेलींकडे आपली गाऱ्हाणी मांडत, त्यामुळे आजही राजन तेली गावागावांतील कार्यकर्त्यांना जवळचे, हक्काचे माणूस वाटतात आणि अनेक कार्यकर्त्यांना देखील ते नावानिशी ओळखतात. राजन तेली यांची प्रशासनावर देखील चांगली पकड आहे. नारायण राणेंच्या छत्रछायेत तयार झालेलं हे रोपटं आता विशालकाय वृक्ष बनलं आहे. राणेंसारखाच त्यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर चांगलाच वचक आहे. त्यामुळेच भाजपा मध्ये प्रवेशकर्ते झाल्यावर जिल्हा भाजपचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले होते. अध्यक्षीय कारकीर्दीत त्यांनी जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी अविरत प्रयत्न केले. गावागावात भाजपा पोचविण्यात राजन तेली यांनी आटोकाट प्रयत्न केले आणि “गाव तिथे भाजपा” हे समीकरण संपूर्ण जिल्ह्यात बनविले.
कणकवली ही कर्मभूमी असली तरी राजन तेलींनी सावंतवाडीतून दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. निवडणुकीत अपयश आले तरी त्यांनी दीपक केसरकर यांना दिलेली लढत लक्ष्यवेधी होती. त्यामुळेच येत्या विधानसभेसाठी काहीही झाले तरी मैदानात उतरणार आणि पुन्हा एकदा जनतेच्या मनातील आमदार होणार अशी दर्पोक्ती केली आहे.
आज माजी आमदार राजन तेली यांचा वाढदिवस…!
या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत याच संवाद मिडिया कडून मनस्वी शुभेच्छा..! 💐