You are currently viewing डॉ. पंजाबराव देशमुखांना भारतरत्न देण्यासाठी खासदार डॉ. अनिल बोंडे यांचा पुढाकार

डॉ. पंजाबराव देशमुखांना भारतरत्न देण्यासाठी खासदार डॉ. अनिल बोंडे यांचा पुढाकार

सर्व खासदारांना केले आवाहन…

 

अमरावती :

 

शिक्षणमहर्षी व भारताचे पहिले कृषी राज्य मंत्री व सुप्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न ही उपाधी देण्यासाठी अमरावतीचे लोकप्रिय खासदार व महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पुढाकार घेतलेला आहे. डॉ. पंजाबराव देशमुखांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. अनिल बोंडे यांनी महाराष्ट्रातील सर्व लोकसभा व राज्यसभा सदस्यांना ई मेल पाठवून भारतरत्न मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे.

डॉ पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांचे शिक्षण क्षेत्रातील व कृषीक्षेत्रातील कार्य नोंदनीय आहे. या संदर्भात त्यांनी पूर्ण भारतात भरीव कार्य केले आहे. त्यांना भारतरत्न ही उपाधी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, याबाबतचे पत्र खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी भारताचे पंतप्रधान मा. ना. श्री. नरेद्र मोदी साहेब यांना रवाना केले आहे.

डॉ पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी शिक्षणक्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी केलेली आहे. १९३२ या वर्षी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची गंगा खऱ्या अर्थाने विदर्भात आणली आहे. आज श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अंतर्गत संपूर्ण विदर्भात असणारे महाविद्यालय, शाळा. वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच वसतिगृह यामुळे लाखो विद्यार्थी उच्च विद्या विभूषित होऊन संपूर्ण जगात विखुरलेले आहेत.

कृषी क्षेत्रात डॉ पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी केलेले कार्य हे केवळ देश पातळीवरच सीमित नसून त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल आंतरराट्रीय पातळीवर घेतल्या गेलेली आहे.

अश्या ह्या महामानवला त्यांच्या १२५ जयंती निमित्त भारतरत्न पुरस्कार देऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा गौरव करावा. या सन्मानासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहेत. वेगवेगळ्या संस्थांनी लोक प्रतिनिधींनी या कमी पुढाकार घेऊन या अभिमानास गती घ्यावी असे ही आवाहन या प्रसंगी त्यांनी केले आहे. दिल्लीला होणाऱ्या संसद अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील सर्व लोकसभा व राज्यसभा सदस्यांची एक सभा आयोजित करण्याचा मानसही याप्रसंगी डॉक्टर अनिल बोंडे यांनी बोलून दाखविला तसेच काही निवडक खासदारांचे शिष्टमंडळ भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना भेटण्यासाठी जाणार असून त्यासाठी देखील डॉक्टर बोंडे हे प्रयत्न करत आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न उपाधी प्राप्त व्हावी यासाठी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी चालविले प्रयत्न क्रियाशील असून त्यांच्या प्रश्नाला यश येईल असा आशावाद सर्वत्र व्यक्त होत आहे. अनेकांनी डॉक्टर बोंडे यांना भेटून त्यांनी चालवलेल्या प्रयत्नां बद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा