You are currently viewing स्मृति भाग ७६

स्मृति भाग ७६

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ७६*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

या आगोदर पाहिलेल्या अध्याय वर्णनानंतर कर्तव्याकर्तव्य वर्णन येते . ज्यात पादत्राणासह जेवण , आसन ( बैठक ) , झोपणे , अभिवादन करणे व नमस्कार करणे सोडून द्यावे , अशा प्रकारची वाक्यरचना वाचावयास मिळते . जे आम्ही विज्ञानयुग म्हणून सहज झुगारुन विरोधात वागावयास धजावतो . पूर्वजांनी लिहिलेले न वाचण्याची शक्ति म्हणा वा पुराणातली वांगी पुराणात म्हणा वा संस्कृत ही मृत भाषा ठरवून म्हणा वा आपण ज्या संस्कृतीत जन्मास आलो तिचीच अवहेलना करतांना आमच्यावर तिच्या सहिष्णुतेमुळे न होणारे प्रहार म्हणून म्हणा वा आमची विकलेली अक्कल पाजळण्याची संधी म्हणून म्हणा , पण आम्ही धजावतो हे खरे !! पण एकदातरी सगळ्या स्मृती सगळ्यांनी जेथे मिळेल तेथे वाचण्याची कृपा करावी . तसेच त्यातून सकारात्मक सार काढण्याचीही कृपा करावी !!! अन्यथा नाश अटळ आहे आणि या नाशास कारणीभूत मानवांची गय भगवंत मुळीच करणार नाही , असे माझे मत आहे . कारण “परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ” हे तोच सांगून गेलाय , म्हणून मी ही अभयी आहे .

पुढील अध्यायात वर्णांच्या वृत्तींचे वर्णन येते . नंतर राजधर्माचे वर्णन येते . ते राजधर्माचे वर्णन वाचले तर १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतातील राज्यकर्ते त्यानुसार वागलेच नाहीत , म्हणून भारत मागे राहिल्याचे आपल्या सर्व वाचकांचे निदर्शनास आल्यावाचून रहाणार नाही . जरुर वाचा . नंतर विविध पापांसाठी दण्डविधान येते . साक्षीविधान येते .

तत्पश्चात् अशौच विधान , श्राद्धविधान येते . मग अनध्याय वर्णन येते . जे सर्वांचे आवडते असू शकते !!😂😂 कारण त्यात अध्ययन केंव्हा करु नये , याविषयी सूचना केल्या आहेत . मग भक्ष्याभक्ष्य वर्णन येते . मग विविध पापांचे कर्मविपाक वर्णन येते . त्यात एका जन्मात पाप केल्यावर पुढील जन्म कसा असावा ? याचे वर्णन आहे . पुनर्जन्मावर विश्वास न ठेवणारे मानणार नाहीतच !!! पण या जन्मात आसुरी वृत्ती वाढू नये , या भीतिखातर तरी पुनर्जन्म मानावयास हवा , हे माझे मत आहे . यावर चिंतकांची प्रतिक्रिया ही आवश्यक वाटते . मजेशीर वर्णन आहे कर्मविपाकाचे . मग सर्व पापांसाठी शान्ति वर्णन , प्रायश्चित्त , व्रते व पुत्रांकरिता सम्पत्तिविभाग वर्णन येवून स्मृति समाप्ति होते .

उद्या नवीन स्मृति पाहू .🙏🙏

तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा