You are currently viewing जखमेवर मीठ चोळतात…!!

जखमेवर मीठ चोळतात…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जखमेवर मीठ चोळतात…!!*

 

निसरड्या नाटकी भूमिकेतून

आसूड अंगावर ओढतात

ढेकळाच्या भेगा दाखवून

जखमांचे घाव लपवतात. .

 

हाताची घडी घालून

तिऱ्हाईता सारखं वागतात

अभावाच्या कहाण्या पेरतं

जखमेवर मीठ चोळतात..

 

अवधी कधी संपेल

क्षणांचाही भरवसा नाही

जखमा भ्रमिष्ट झाल्यात

वरून आकाशवाणीही नाही..

 

गोजि-या माझ्या देशात

नुसता बुजगावण्याचा धाक

पसरला जातींचा पसारा

सहजीवन संस्कृतीची राख..

 

अर्धवट जळालेल्या जातीद्वेषांत

घर माझही जळत..

माझ्या देशाचं काळीज

आपल्या पोरांकरता रडत..

 

जखमांनाही जाणीव होती

बोभाटा मीठाने होणार

गाव तुझंमाझं नाही

प्रिय देशाचं पेटणार….!!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा