*निष्ठा यात्रेची मालवणात दमदार सुरुवात*
*आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आचरा येथे झाला शुभारंभ*
उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिक चंग बांधला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यातील निष्ठा यात्रेचा शुभारंभ आचरा येथून करण्यात आला. प्रथमतः आचरा येथील श्री. देव रामेश्वर मंदिरात दर्शन घेऊन या यात्रेची सुरुवात करण्यात आली. सलग ४५ दिवस हि निष्ठा यात्रा सुरु राहणार आहे.आचरा येथे देखील निष्ठा यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी निष्ठावंत शिवसैनिक,नागरिकांशी संवाद साधला. विकास कामांचा आढावा घेतला. झालेल्या विकास कामांबद्दल नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले.
राज्यात अनेक आमदारांनी गद्दारी केली मात्र आमदार वैभव नाईक पक्षाशी एकनिष्ठ राहिले.जिल्ह्यातील जनतेशी एकनिष्ठ राहिले. कुडाळ मालवण मतदार संघाची शान त्यांनी वाढविली. कारवाई झाली तरी ते डगमगले नाही. त्यामुळे निष्ठावंत राहिलेल्या आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी जनता आहे. मालवणची जनता पुन्हा एकदा त्यांना निवडून देणार असल्याचा विश्वास जेष्ठ शिवसैनिक नारायण कुबल, भाऊ परब यांनी व्यक्त केला.
हरी खोबरेकर म्हणाले, उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याच्या उद्देशाने आणि निष्ठावंतांच्या सन्मानार्थ सुरु केलेली हि निष्ठा यात्रा संपूर्ण मालवण तालुक्यात राबविणार आहोत. लोकांना याचे महत्व पटवून सांगितले जाणार आहे. लोकशाही नष्ट करण्याचे काम देशात सुरु आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा याच धोरणाने सत्ताधारी काम करीत आहेत. भरमसाठ महागाई वाढत आहे. हे थांबविण्याची ताकद जनतेमध्ये आहे.निवडणुकीत जनता याचा समाचार नक्कीच घेईल असे सांगितले.
आचरा येथे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, मालवण तालुका समन्वयक पूनम चव्हाण,आचरा विभागप्रमुख समीर लब्दे,नारायण कुबल,भाऊ परब, समन्वयक जिजा टेमकर, पप्पू परुळेकर, ग्रा. प. सदस्य अनुष्का गावकर, जगदीश पांगे, नितीन घाडी, सदानंद घाडी,पूर्वा तारी,आबा सावंत, प्रसाद कावले, सचिन परब, अर्चन पांगे,रूपम टेमकर, परेश तारी,जितू आचरेकर, सुंदर आचरेकर,नबीला नाईक, राजू नार्वेकर,अनिकेत मांजरेकर, समीर ठाकूर, संजय परब,सचिन बागवे,रणजित पांगे,भाऊ कावले,माणिक राणे,अक्षय पुजारे,मारुती मेस्त्री,छोटू पांगे,श्री. मिराशी, विठ्ठल सारंग,वैभव कुमठेकर,दिलीप पराडकर, अक्षय रेवंडकर आदी उपस्थित होते.