You are currently viewing परीस स्पर्श

परीस स्पर्श

परीस स्पर्श

न्युज स्टोरी टुडे पोर्टल ला २२ जुलै रोजी ४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल,या पोर्टल मुळे स्वतःच्या जीवनात कसे परिवर्तन झाले आहे,हे सांगताहेत लेखिका सौ प्रतिभा पिटके…
– संपादक

असं म्हणतात की, परिस स्पर्शाने लोखंडाचे सोने होते.आजपर्यंत असा परीस कुणी पाहिलेला नाही. परंतु लाक्षणिक अर्थाने
परीस स्पर्श ही कल्पना वास्तवात आहेच आहे. मी उगीच काही पुरावा असल्याशिवाय हे म्हणत नाहीय .कारण मला स्वतःला अशा परीस स्पर्शाचा अनुभव आला आहे. तुम्ही म्हणाल खोटं बोलायची कमाल सीमा ओलांडली तुम्ही! कुठे सापडला हा परीस? सांगू ?अहो सौ अलकाताई व श्री देवेंद्र भुजबळ या दोघांच्या रुपात पाहिला आहे मी परीस. तुम्ही म्हणाल कोणते लोखंड ? सांगायलाच पाहिजे का ? अर्थात मी!

झाले असे की, मी अनेक दिवसापासून साकव्य समूहावर न्यूज स्टोरी टुडे पोर्टल पहात होते. वेगवेगळ्या साहित्य प्रकाराला मिळत असलेली प्रसिद्धी पाहुन मनात विचार आला की, इतके मोठे कार्य करणाऱ्या श्री देवेंद्र भुजबळ यांच्याबद्दल आपण लिहायला हवं ! सगळ्यांना इतकी प्रसिद्धी देणारे हे व्यक्तिमत्व! त्यांचे कौतुक व्हायलाच हवे! इतक्या मोठ्या माणसाशी काय, कसं बोलायचं ? मनात धाकधूक ठेवून त्यांच्याशी संपर्क साधला.लक्ष्यात आलं की आपली भीती निराधार आहे. मला पाहिजे ती माहिती त्यांनी दिली व त्यांच्याबद्दल लिहीलेल्या “एक कर्तुत्ववान मुसाफिर” हा लेख आपल्या दै हिंदुस्थान मध्ये प्रसिद्ध झाला. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या . खूप छान लिहिलं असे अनेक फोन आले. कौतुक कुणाला नको असतं ?

अशा आनंदात असतांना विचार केला की न्युज स्टोरी टूडेच्या निर्मात्या अलकाताईबद्दल आपण लिहायला हवं! त्यांच्याशी ओळख नव्हती.मनात तेच प्रश्न, शंका त्या कशा असतील ? कसा प्रतिसाद मिळेल ? म्हणून पुन्हा देवेन्द्रजी जवळ इच्छा व्यक्त केली आणि त्यांचा आणखी एक गुण मला कळला, ते म्हणाले, एकाच कुटूंबातील व्यक्तींबद्दल लागोपाठ लिहिणे बरे दिसणार नाही. किती दुरदर्शिता !

एकदा त्यांच्याशी बोलतांना कळले की अलकाताईचा १८ एप्रिलला वाढदिवस असतो. या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन मी “प्रेरणेचा झरा” हा लेख लिहिला.त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. शिवाय अलकाताईंच्या रुपात एक चांगली मैत्रीण मिळाली.अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया आल्या आणि देवेंद्रजीनी पुन्हा १९ एप्रिल २४ रोजी स्टोरी टुडे चा विशेष अंक काढून “असा रंगला वाढदिवस” व “छान प्रतिसाद” अंतर्गत माझ्या लेखांवर आलेल्या प्रतिक्रियांना प्रसिद्धी दिली. मन भरून आले! यात पुन्हा भुजबळ पतीपत्नीचा मोठे पणाच दिसून आला.

आज हे पोर्टल ८५ पेक्षा जास्त देशात कार्यान्वित आहे २२ जुलै २०२४ ला या पोर्टलला ४ वर्षे पूर्ण होत आहेत. कोरोना काळात सारा समाज एका अनामिक भीतीने ग्रस्त झालेला असतांना ह्या पोर्टल ची निर्मिती झाली .उद्देश हाच की घाबरलेल्या समाजाला नवजीवन मिळावे. कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, आरोग्य,यश कथा अशा विविध पातळीवर लिहिणाऱ्यांना लिहिते करून पोर्टल विश्व बंधुत्वाची जाणीव निर्माण
करण्यासाठी प्रयत्नशील आहे .विशेष म्हणजे या पोर्टल वर प्रकाशित झालेल्या काही लेखांचे पुस्तक ही प्रकाशित करण्यात आले आहे . केवळ
आणि केवळ समाजासाठी भुजबळ पतिपत्नी हे काम करीत आहेत त्यात त्यांना आर्थिक लाभ काहीही नाही ही बाब आपण लक्षात घेतलीच पाहिजे
श्री भुजबळांचा मंत्रालयात माहिती संचालक पदावर काम करण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे इच्छा असेल तर स्वप्रयत्नाने मनुष्य हवे ते मिळवू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देवेंद्रजी! नुकतेच त्यांच्या आम्ही अधिकारी झालो ह्या पुस्तकाचे जपानच्या बुलेट ट्रेन मध्ये प्रकाशन झाले न्यूज स्टोरी असे अनेक उपक्रम नेहमीच राबवत असते या पोर्टल ला त्यामुळेच अनेक पुरस्कार मिळाले ले आहेत! पोर्टलची वाढती लोकप्रियता पाहून आपल्या साहित्यकृतीला यात स्थान मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असणे साहजिक आहे
मी एक सामान्य वयस्कर स्त्री. !विरंगुळा म्हणून लिहिते.
आणि या लोखंडाला भुजबळ पतीपत्नीच्या मोठेपणाचा परीस स्पर्श झाला आणि लोखंडाचे सोने झाले.

२२ जुलै ला चार वर्षे पूर्ण करणाऱ्या या पोर्टलला १०० वर्षाचे उदंड आयुष्य मिळो, दशदिशात पोर्टलची कीर्ती वाढो ही शुभेच्छा.
-प्रतिभा पिटके
अमरावती.

प्रतिक्रिया व्यक्त करा