You are currently viewing गुलाबस्तवन… ४४वे…!!

गुलाबस्तवन… ४४वे…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुलाबस्तवन… ४४वे…!!*

 

तुटणारे अगणित तारे बघुन

तू उगाच आक्रोश करतोस

आभाळालाही फुटतो पान्हा

शुष्क मातीतून तू उगवतोस..

 

थेंब टपोरा अंगावर येताच

तू वेडा होऊन फुलतोस

पावलागणिक पसरली माती

ती मंतरून जगाला नाचवतोस..

 

ॠणाइतकाच तू प्रिय माझा

मला जगण्याचा मार्ग दाखवतोस

तसं तुझ्याशिवाय कुणी नाही मला

माझ्या आयुष्याला तू आधार देतोस

 

तू मला पालकत्व दिलसं

माझं पालकत्व तू स्विकारलसं

आईबाबांच्या वासल्यस्पर्शात बहरलो

तुझ्या मायेने जगण्याचं सोनं केलसं

 

अनंत माझ्या फुलांच्या शय्येवर

परमेश्वर अंगणात विराजमान झाले

साखरझोपेत पहाटेला जाग आली

गात अभंग! ह्दयातळी प्राण उतरले

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा