You are currently viewing कोलगाव कुंभारवाडी ग्रामस्थांना सावंतवाडी शहरात येण्यासाठी छोट्याशा वीज खांबाच्या पुलावरून करावी लागते तारेची कसरत

कोलगाव कुंभारवाडी ग्रामस्थांना सावंतवाडी शहरात येण्यासाठी छोट्याशा वीज खांबाच्या पुलावरून करावी लागते तारेची कसरत

कोलगाव कुंभारवाडी ग्रामस्थांना सावंतवाडी शहरात येण्यासाठी छोट्याशा वीज खांबाच्या पुलावरून करावी लागते तारेची कसरत

पुलाची डागडुजी करून प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी ग्रामस्थांची सत्ताधारींकडे मागणी

सावंतवाडी

*सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव कुंभारवाडी येथे कित्येक वर्षानुवर्षे सावंतवाडीतील झिरंग 7 नंबर शाळा येथे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना तसेच तेथील ग्रामस्थांना व वृद्धांना व महिलांना सावंतवाडी शहरात व बाजारात येण्यासाठी छोट्याशा वीज खांबाच्या पुलावरून येण्यासाठी तारेची कसरत करून यावे लागते. यासाठी कुठलेही सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षांचे स्थानिक नेते यांनाही सर्व बाब माहीत असूनही आजपर्यंत या गोष्टीकडे कानाडोळा चालला आहे.*

*पुलाच्या मध्यभागी नाला असल्याने पावसाळ्यात सुद्धा तीन सिमेंटच्या खांबावरून नागरिकांना सावंतवाडीत ये-जा करावे लागते ही बाब अतिशय दुर्दैवजनक असून त्यासाठी कुठल्याही सर्व पक्षीय नेते मंडळींनी ग्रामपंचायत मार्फत जाण्या-येण्याचा मार्ग आरक्षित करून ग्रामपंचायत मार्फत पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा*

*त्याचप्रमाणे त्या नाल्या वरती तीन सिमेंटचे पोल असल्याने आज एक पोल मोडकळीस आला असून विद्यार्थी व वृद्ध महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून शहरात बाजारात येण्यासाठी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना जवळचा मार्ग असल्याने हा प्रश्न मार्गी लावावा. तसेच त्या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे ती वाट घसरतीची झाली आहे व तेथे आधारासाठी काहीच उपलब्ध नसल्याने नाल्याच्या पाण्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी तेथे आधारासाठी रेलिंग असणे आवश्यक आहे.*

*यासाठी भाजप नेते तसेच सिंधुदुर्ग बँकेचे संचालक महेश जी सारंग. महाराष्ट्राचे युवा भाजपचे उपाध्यक्ष विशाल जी परब. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या सौ अर्चना घारे परब. जिल्हा परिषद चे माजी सदस्य मायकल डिसूजा. यांनी व तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर. पालकमंत्री रवींद्र चव्हाण व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांनी लवकरात लवकर तात्पुरती असलेल्या पुलाची डागडुजी करून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा असे आवाहन तेथील ग्रामस्थांनी केले आहे.*

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓*

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*

*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*

🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*

💁🏻‍♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇

*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा