गवळी तिठा येथे माजी आमदार राजन तेली यांच्याहस्ते उद्घाटन
सावंतवाडी –
ओवळीये गावचे सुपुत्र तथा युवा उद्योजक आशिष गुंडू सावंत यांच्या सावंतवाडी शहरातील ‘वेलकेअर फार्मसी’ या दुसऱ्या औषध दुकानाचा शुभारंभ माजी आमदार राजन तेली यांच्याहस्ते करण्यात आले. आशिष सावंत यांचे सावंतवाडी बाजारपेठेतील हॉटेल मॅंगो लगत व्यंकटेश्वरा मेडिकल असून त्यांनी गवळी तिठा येथे ‘वेलकेअर फार्मसी’ हे दुसरे औषध दुकान सुरू केले आहे.
आशिष सावंत यांनी औषध व्यवसायातील डी फार्म पदवी प्राप्त केली असुन त्यांच्या पत्नी सौ कविता सावंत बि फार्म पदवी प्राप्त आहेत. आशिष सावंत गेली सहा वर्षे दिवसरात्र कष्टाने, प्रामाणिकपणे, सचोटीने व नि:स्वार्थीपणे काम करीत ग्राहकांना चांगली सेवा देत आहेत. कोरोना काळातही त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू जनतेला औषधे उपलब्ध करून दिली. औषध व्यवसायात त्यांनी अल्पावधीतील सर्वोत्कृष्ट कार्य केले आहे. फार्मासिस्ट वर्ग हा सामाजिक आरोग्य व्यवस्थेचा एक महत्वाचा घटक असून सामाजिक बांधिलकी जपून आशिष सावंत ग्राहकांना प्रामाणिकपणे व सातत्यपूर्ण सेवा देत आहे. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देताना जोखीम पत्करून देऊन रात्री-अपरात्री अविरत अखंड सेवा बजावत आहे.
यावेळी आशिष सावंत यांची पत्नी सौ कविता सावंत, वडील तथा सांगेली केंद्र प्रमुख गुंडू सावंत, आई सेवानिवृत्त शिक्षिका सौ युगंधरा सावंत, आजोबा अनंत मुळीक आदी उपस्थित होते. यावेळी सर्वेश तेली, प्रथमेश तेली, शिक्षक नेते म. ल.देसाई, डॉ सतीश सावंत,ओवळीये माजी उपसरपंच सागर सावंत, सामाजिक युवा कार्यकर्ते मनोज सावंत, शिक्षक जिल्हा पतपेढीचे संचालक सुभाष सावंत, केंद्रप्रमुख प्रमोद पावसकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवित शुभेच्छा दिल्या.