You are currently viewing बिळवस येथील शेतकरी चंदू पाताडे यांना आम. वैभव नाईक यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात

बिळवस येथील शेतकरी चंदू पाताडे यांना आम. वैभव नाईक यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात

*आम. वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांच्या हस्ते केली मदत सुपूर्त*

 

मसुरे :

 

बिळवस येथील शेतकरी चंदू पाताडे यांची शुक्रवारी दुपारी वीज वितरणाच्या हलगर्जीपणामुळे विजेचा शॉक लागून तीन बैल मृत्युमुखी पडले. ऐन शेतीचा हंगाम सुरू असताना दुर्दैवी घटना घडल्याने शेतकरी चंदू पाताडे यांना आर्थिक मदतीचा हात देत आमदार वैभव नाईक यांनी धीर दिला. तसेच लवकरात लवकर सदर वीज वितरणाकडून नुकसान भरपाई मिळून देणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले. यावेळी पाताडे कुटुंबीयांनी आम. वैभव नाईक यांचे मनापासून आभार मानले.

यावेळी आम. वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार सावंत, युवासेना उपतालुकप्रमुख अमित भोगले, सिद्धेश मांजरेकर, आनंद पालव,राहूल सावंत, सचिन पालव, ज्ञानेश फणसे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा