You are currently viewing गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग .सातपुते लिखित अप्रतिम लेख*

*गुरुपौर्णिमा*
🕉️
*आपल्या प.पू. गुरूंच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस.*

या दिवसाला *व्यासपौर्णिमा* देखील संबोधले जाते.म्हणून आषाढ़ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हटले जाते. ज्यांनी महाभारत पुराण हा अलौकिक ग्रंथ लिहिला त्या *वंदनीय व्यासमुनींना विनम्र वंदन करून त्यांची यथासांग पूजा करण्याचा हा मंगल दिवस आहे.* त्यांच्यासारखे श्रेष्ठ आचार्य , मुनी ,ऋषी अद्याप झालेले नाहीत अशी आपल्या सारख्या सहृदांची अगाध श्रद्धा आहे. आणि हे सत्य आहे.

*गुरु , आचार्य हे भगवंतापेक्षाही श्रेष्ठ आहेत त्यांनाच श्रद्धापूर्वक ईश्वर मानावे असे शास्त्रात कथन केलेले आहे.*

*व्यासोच्छीष्टम जगत सर्वम* असे त्यांच्याबद्दल लिहिले गेले आहे. एव्हडेच नव्हे तर *महर्षीव्यास हे भारतीय संस्कृतिचे शिल्पकार , आद्यजनक आणि मूलाधार मानले जातात. ज्या प्राचीन पुरातन ग्रंथात धर्मशास्त्र ,नीतीशास्त्र, राज्यशास्त्र , व्यवहारशास्त्र , मानसशास्त्र अशा विषयांचा परामर्श घेतला आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला आहे . म्हणून ज्यांना आपण ज्ञानियांचा राजा म्हणून मानले आहे त्या ज्ञानदेवांनीसुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना ” *व्यासांचा मागोवा घेतू* असे म्हणून लिहिण्यास सुरुवात केली आहे.
*व्यासपौर्णिमेच्या दिवशी ” 🕉️ ” नमोस्तुते व्यास , विशाल बुद्धे ” अशी प्रार्थना करून प्रथम व्यासांना वंदन करण्याचा प्रघात आहे. परंपरा आहे. आपल्या भारतभूमीमध्ये अगदी प्राचिन कालापासून रामायण , महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आलेली आहे. ज्यांच्या कडून आपण विद्या प्राप्त करतो , मिळवतो , शिकतो आणि त्याच विद्यार्जनाच्या बळावर आपण आपल्या जीवनाचा कृतार्थ उद्धार करतो अशा गुरुंचा सन्मान करणे , आदर करणे , त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हेच आपले निजी कर्तव्य आहे. आणि हीच प्रथा पूर्वापार *महर्षी व्यासमुनी पासून सुरु झाली असून ती आजपर्यन्त अव्याहत सुरु आहे.*

आपण कोणाचे तरी शिष्य आहोत , आपले कोणीतरी गुरु आहेत ही भावनांच मुळात कृतार्थी कृतज्ञतेची आहे. म्हणून ” *गुरू* ” ही सर्वश्रेष्ठ अनुभूती आहे श्रद्धा आहे.

*आपल्या जन्मात प्रथम आपले परमपूज्य आईवडिल हेच आपले आद्य गुरु आहेत हे निर्विवाद.!! तर बाह्य जगतात आपले शिक्षक आपले गुरू असतात म्हणून या सर्वांच्या बद्दल आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे.*

भारतीय गुरुपरंपरेत अनेक वंदनीय गुरु-शिष्याच्या जोड्या प्रसिद्ध आहेत.
*जनक-याज्ञवल्य*,*कृष्ण-सुदामा*, *शुक्राचार्य-जनक*, *विश्वामित्र- राम,लक्ष्मण* *परशुराम- कर्ण, *द्रोणाचार्य-अर्जुन* अशी परंपरा प्रत्ययास येते. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय रहात नाही.

गुरुपौर्णिमा म्हणजे सद्गुरुंची , ऋषी ,मुनींची , संत , गुरुंची पौर्णिमा मानली जाते. आणि ही श्रद्धा आहे.

*पौर्णिमा म्हणजे सत्यप्रकाश* गुरु शिष्याला ज्ञान देतात. शिष्याचे अंतरंग उजळून त्याला आत्ममुख करतात . ज्ञानाचा प्रकाश आपल्या शिष्यापर्यंत पोहचवितात म्हणून कृतज्ञता पूर्वक गुरुंची प्रार्थना करावयाची तो हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा !!

गुरु *ज्ञानाचा सागर* आहे.
जलाशयात प्रचंड , विपुल पाणी आहे. परंतु घटाने किंवा घागरीने खाली मान घालून पाणी भरले तरच पाणी मिळते तसेच गुरुजवळ नम्र झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.

*गुरु बीन ज्ञान कहाँसे लाऊँ ?*
*किंवा गुरुविण कोण दाखविल वाट?*

हेच खरे..!!
म्हणूनच कृतज्ञतेपोटी आपल्याच मुखातून…
*गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः , गुरुर्देवो महेश्वर: ।।*
*गुरु: साक्षात परब्रह्म , तस्मै श्री गुरवेनमः।।*
हा मंत्र उच्चारला जातो.
*गुरू भेटणे ,गुरू लाभणे हे परमभाग्य आहे.*
त्यासाठी परमश्रद्धाभक्ती असणे महत्त्वाचे आहे. मग गुरुकृपा होते आणि जीवनाचे सार्थक होते……!!
🙏
*इती लेखन सीमा…*

*वि.ग.सातपुते.( विगसा.)*
*अध्यक्ष:, महाकवी कालीदास प्रतिष्ठान पुणे.*
📞: *(9766544908)*

______________________________

*संवाद मीडिया* जाहिरात

*🍀प्रवेश सुरू…!! प्रवेश सुरू…!!प्रवेश सुरू…!!🍀*

_सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_
_डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._
https://sanwadmedia.com/142095/

*📌छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस📌*
कॉलेज कोड  – 11164

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि
डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..
        उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत कृषी क्षेत्रात उज्वल भविष्य घडवा…

*[B. Sc. (Agri) कृषी पदवी*
*Qualification – 12th Science pass (PCB/PCBM) MHT-CET/ JEE/NEET]*

*(B. Sc. Agri (Hon) कृषी पदवी)*
*📚अभ्यासक्रम कालावधी- 4 वर्ष (8 सत्र)*📚

♦️ *पात्रता- 12 वी (विज्ञान शाखा उत्तीर्ण)*♦️
*(भौतिकशास्त्र, रासायनशास्त्र, जिवशास्त्र/ गणित)*

*प्रवेश प्रक्रिया – ऑनलाईन*

*(महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध)*

*प्रवेश क्षमता – 90 विद्यार्थी*

*🌴महाविद्यालयाची वैशिष्ठये🌴*

🌳सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त पदवी महाविद्यालय.(22 वर्ष)

🌳 मुंबई गोवा हायवे पासून फक्त 1 कि.मी.च्या अंतरावर व सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून 2 कि.मी. च्या अंतरावर

🌳 मागील 4 वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची रँकिंग – IBPS, MBA, M.Sc. व स्पर्धा परीक्षेतून विविध पदावर निवड

🌳 नैसर्गिकशेती प्रशिक्षण केंद्र समृद्ध व आनंदी गाव योजनेचे केंद्र.

🌳 उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.

🌳 संगणक इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणारे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.

🌳 कॅम्पस इंटरव्यू द्वारे रोजगाराच्या / नोकरीच्या संधी उपलब्ध.

🌳 मागास विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ.

🌳 आर्थिक मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती.

🌳 एकमेव कृषी महाविद्यालय जेथे NCC / NSS उपलब्ध.

🌳 कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण.

🌳 खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती प्रकल्प अंतर्गत फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे विद्यार्थ्यांना मोफत

*📲_*अधिक माहिती साठी संपर्क*_
🔴 Principal – (CSCAKO)
Prof. Yogesh Pednekar
*📲 9420360912 | 9373724192*

🔴 Asso. Professor
Mahesh L. Parulekar
*📲 9422373717*

🔴 Sr. Clerk
Dhondu Colwankar
*📲 9421266607*

🔴 Accountant
Santosh P. Sawant
*📲 9322707214*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा