श्री रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताह सोमवारपासून…
वेंगुर्ला
वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताह २२ ते २९ जुलै या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त २२ जुलै रोजी स.९ वा. सप्ताहाची सुरुवात झाल्यानंतर रोज अष्टोप्रहर भजने, रामेश्वर व राम मंदिरात पौराणिक कथांवर आधारित देखावे, स्थानिक कलाकारांची रांगोळी प्रदर्शने असे कार्यक्रम होणार आहेत.
दि.२२ रोजी सायं.७ वा. ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ रेडी, रात्रौ ८ वा. दत्तप्रासादिक भजन मंडळ कुबलवाडा, दि.२३ रोजी सायं.७ वा. अचानक भजन मंडळ, रात्रौ ८ वा. देऊळवाडा भजन मंडळ-वेंगुर्ला, दि. २४ रोजी सायं. ७ वा. मुळपुरुष भजन मंडळ-वडखोल, रात्रौ ८ वा. श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मडळ-मातोंड, रात्रौ ९ वा. विठ्ठल पंचायतन सांप्रदाय-सुरंगपाणी, दि. २५ रोजी सायं. ७ वा. श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ-तळेकरवाडी (सुरंगपाणी), रात्रौ ८.३० वा. ब्राह्मण भजन मंडळ-भेंडमळा, दि. २६ रोजी सायं.७ वा. वाटोबा भजन मंडळ-उभादांडा, रात्रौ ८ वा.ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ नमसवाडी, दि. २७ रोजी सायं. ६ वा.श्री रामेश्वर संयुक्त संगीत भजन मंडळ-वेंगुर्ला, रात्रौ ८ वा.बागायतवाडी भजन मंडळ-शिरोडा, दि.२८ रोजी सायं. ७ वा. श्री देव सिद्धेश्वर भजन मंडळ-कोंडुरा, रात्रौ ८.३० वा.धावडेश्वर भजन मंडळ-कॅम्प या मंडळांचा समावेश आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.