You are currently viewing नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी १९ ऑगस्टपासून

नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी १९ ऑगस्टपासून

नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी १९ ऑगस्टपासून

 सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील सर्व पथक/ उप पथकामधील पुरुष/ महिला होमगार्डच्या प्रवर्गासाठी नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी दि. १९ ते २१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ वाजेपासून  पोलीस मुख्यालय कवायत मैदान सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथे होणार आहे. तरी नवीन सदस्य नोंदणीसाठी जिल्ह्यातील उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अपर पोलीस अधिक्षक तथा जिल्हा समादेशक कृषिकेश रावले यांनी केले आहे.

         जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या एकूण १७८ होमगार्ड सदस्य व १०० होमगार्ड सदस्यांची जागा अजुन रिक्त होण्याची शक्यता आहे. उमेदवाराची नोंदणी झाल्यानंतर त्या – त्या दिवशी पोलीस भरती प्रमाणे धावणे व गोळाफेक मैदाणी चाचणी होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 होमगार्ड नोंदणी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे असतील.

शिक्षण कमीत कमी १० वी उत्तीर्ण, वय २० ते ५० वर्ष, उमदेवाराची निवड पुर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल तसेच दिनांक- १९/०८/२०२४ रोजी वयाची २० वर्ष पुर्ण तसेच दिनांक- १९/०८/२०२४ रोजी नंतर वयाची ५० वर्ष पूर्ण न झालेला उमदेवार असावा. उमदेवारानी येते वेळी ४ पासपोर्ट फोटो व मुळ कागदपत्रांच्या २ प्रति Self Attested करुन घेऊन याव्यात. उंची- पुरुषाकरिता १६२ सेंमी व महिला करिता १५० सेंमी. सबंधित उमेदवारास विहित केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक शारिरीक चाचणी द्यावी लागेल

विशेष बाब :

 होमगार्ड सदस्य नोंदणीमध्ये पात्र झालेल्या उमदेवारांना पोलीस भरती, अग्निशमन दल, वन विभागामध्ये, होमगार्डची ३ वर्षे सेवा बजावल्यानंतर ५ टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. निवड होऊन पात्र ठरलेले उमदेवार हे वेतनी सेवेत असतील तर त्यांना वेतनी सेवेत असल्यास कार्यालयाचे अथवा मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्र धारक व इतर अन्य तपशिलाच्या पुष्टयर्थ सर्व सबंधित प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहिल. उमेदवारास नोंदणीच्या वेळी त्यांना स्वखर्चाने यावे लागेल. तसेच नोंदणीच्या वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी सबंधित उमेदवाराची राहील. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्र. (०२३६२) २२८८३१ वर संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा