*ज्येष्ठ कवयित्री मानसी जामसंडेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*धुंद पावसात*
*बेधुंद पर्जन्यधारा*
नहात धुंद पावसात
सारा आसमंत….
बेधुंद पर्जन्याच्या धारा
असतात कोसळत….
अहोरात्र अविरत
ओलीचिंब झाली धरा
नभ माती मीलनात
ओलेती सृष्टी नवथर
थरकली तियेची काया
फळंफुलांचा येई बहर
चिंब तृप्त काळीमाय
प्रसवली बीजांकूरात….
डोकावे हरित पर्ण
ते कोवळे लुसलुशीत
ओल्या मृदगंधात
चराचर गंधाळत….
झाली सृष्टी नवयौवना
सप्तरंगी वेणीत
हिरव्यागार शालूत
दिसे साजरी बावरी
नववधु ती लज्जीत…. ,
धुंद पावसात….
बेधुंद धुक्याची चादर
लपेटून अवनी
निजली गाढ सत्वर…..
*मानसी जामसंडेकर, गोवा*