You are currently viewing सिंधुदूर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीच्या “मार्केट यार्डला ” मिळणार हक्काची जागा

सिंधुदूर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीच्या “मार्केट यार्डला ” मिळणार हक्काची जागा

सिंधुदूर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीच्या “मार्केट यार्डला ” मिळणार हक्काची जागा

*आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला आले यश

*जमीन खरेदीचा प्रश्न लागला मार्गी, पणन संचालकांनी दिली परवानगी

*कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांनी दिली माहिती

कणकवली
सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीला मार्केट यार्ड बनवण्यासाठी लागणारी जागा खरेदी करण्याची परवानगी राज्याच्या पणन संचालकांनी दिली आहे. नांदगाव रेल्वे स्टेशन नजीक ही जागा निश्चित करण्यात आली असून या जागेची खरेदी करण्याचा मार्ग सुखकर झाला आहे. भविष्यात कृषी उत्पन्न बाजार समितीला सर्व सोयींनी परिपूर्ण असे मार्केट यार्ड या जागेत उभे करता येणार आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकानंतर ही परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांनी दिली आहे.दरम्यान हा जमिनीचा प्रश्न सुटावा म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांनी सर्वच स्थरावर पत्र व्यहार करून आग्रही मागणी केली होती.या सर्व प्रयत्नांना यश आले आहे.
सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समिती व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदूर्ग यांचेकडील मुख्य बाजार आवार जमीन खरेदी करीता मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव महाराष्ट्र राज्य पणन संचालक पुणे प्रस्ताव दिला होता. त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीने कणकवली तालुक्यातील वाघेरी येथे बाजार आवार समितीसाठी ४.९१ क्षेत्र एवढी बिनशेती जमीन खरेदीसाठी मालक लाल सिंग ठाकूर व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाटाघाटीत १ कोटी ७५ लाख एवढी किंमत ठरली आहे. या प्रस्तावाला पणन संचालक विकास रसाळ यांनी मंजुरी दिली आहे. यासाठी सभापती तुळशीदास रावराणे यांनी आ. नितेश राणे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार आ. नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
नांदगाव रेल्वे स्टेशन नजिक वाघेरी येथील बिनशेती भूखंड मूळ गट नं. १७४५ क्षेत्र १.८३ व मूळ गट नं. १७४६ क्षेत्र ३.१३ हे. आर पोटखराब असे एकूण क्षेत्र ४.९१ जमीन खरेदीसाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या दि. ३० मे २०२४ रोजीच्या मासिक सभेत मंजुरी दिली होता. प्रस्तावित जमीन खरेदीसाठी लागणारा निधी १ कोटी ७० लाख जिल्हा बँकेने मंजूर केले आहे अशी माहिती यावेळी सभापती तुळशीदास रावराणे यांनी देवून जिल्हा बँकचे आभार मानले आहेत.
एकूण रक्कम रु. १ कोटी ७५ लाख एवढ्या रक्कमेस खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम १२ (१) अन्वये अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मार्केट यार्डचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

*🍀प्रवेश सुरू…!! प्रवेश सुरू…!!प्रवेश सुरू…!!🍀*

_सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_
_डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._

*📌छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस📌*
कॉलेज कोड  – 11164

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि
डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..
        उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत कृषी क्षेत्रात उज्वल भविष्य घडवा…

*[B. Sc. (Agri) कृषी पदवी*
*Qualification – 12th Science pass (PCB/PCBM) MHT-CET/ JEE/NEET]*

*(B. Sc. Agri (Hon) कृषी पदवी)*
*📚अभ्यासक्रम कालावधी- 4 वर्ष (8 सत्र)*📚

♦️ *पात्रता- 12 वी (विज्ञान शाखा उत्तीर्ण)*♦️
*(भौतिकशास्त्र, रासायनशास्त्र, जिवशास्त्र/ गणित)*

*प्रवेश प्रक्रिया – ऑनलाईन*

*(महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध)*

*प्रवेश क्षमता – 90 विद्यार्थी*

*🌴महाविद्यालयाची वैशिष्ठये🌴*

🌳सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त पदवी महाविद्यालय.(22 वर्ष)

🌳 मुंबई गोवा हायवे पासून फक्त 1 कि.मी.च्या अंतरावर व सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून 2 कि.मी. च्या अंतरावर

🌳 मागील 4 वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची रँकिंग – IBPS, MBA, M.Sc. व स्पर्धा परीक्षेतून विविध पदावर निवड

🌳 नैसर्गिकशेती प्रशिक्षण केंद्र समृद्ध व आनंदी गाव योजनेचे केंद्र.

🌳 उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.

🌳 संगणक इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणारे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.

🌳 कॅम्पस इंटरव्यू द्वारे रोजगाराच्या / नोकरीच्या संधी उपलब्ध.

🌳 मागास विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ.

🌳 आर्थिक मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती.

🌳 एकमेव कृषी महाविद्यालय जेथे NCC / NSS उपलब्ध.

🌳 कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण.

🌳 खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती प्रकल्प अंतर्गत फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे विद्यार्थ्यांना मोफत

*📲_*अधिक माहिती साठी संपर्क*_
🔴 Principal – (CSCAKO)
Prof. Yogesh Pednekar
*📲 9420360912 | 9373724192*

🔴 Asso. Professor
Mahesh L. Parulekar
*📲 9422373717*

🔴 Sr. Clerk
Dhondu Colwankar
*📲 9421266607*

🔴 Accountant
Santosh P. Sawant
*📲 9322707214*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/142095/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा