You are currently viewing कांदा

कांदा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”कांदा”*

 

कंद मूळ ईश्वरी देणं चमत्कार

कांदा भूमीचे वरदान चवदार IIधृII

 

कांदा देई आरोग्य मनुष्य तनुला

मूर्च्छा येताच देतात हुंगायला

कांदा कापता नेत्री येई अश्रूधार II1II

 

पावसाने होई वातावरण प्रसन्न

कांदा भजीचे आहे अजब रसायन

करी आकर्षित घ्यावा समाचारII1II

 

भज्यांचे असती अनेक प्रकार

बेसन कांद्याची आहे गट्टी अपार

मिश्रण सोडता तेलात मन अनावर II3II

 

भजी आवडती सर्वांना चमचमीत

पूरवी जीभेचे चोजले करी तृप्त

खुसखुशीत भजी आणिती शहारII4II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा