“बेरोजगार, तरुण मिञानों, समजून घ्या ” लाडका भाऊ योजना “… अॅड. नकुल पार्सेकर
लाखो बेरोजगार तरुण तरुणी रोजगाराच्या शोधात आहेत. महाराष्ट्र शासनाने पंधरा दिवसापूर्वी बहीणीसाठी मुख्यमंञ्यांच्या नावाने ” मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ” ऐन निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली आणि त्यासाठी तब्बल शेहेचाळीस हजार कोटींची अर्थसंकल्पात तरतुदही केली. लाभार्थ्यांचे फाॅर्म वगैरे भरण्याची प्रक्रियापण सुरु झाली.
बहिणीला मा. मुख्यमंत्र्यांनी भाऊबीज दिली आमचं भावांच काय ❓ अशा प्रकारचं जोरदार ट्रोलींग समाज माध्यमातून सुरू झालं… आणि पंढरपूर येथे मा. मुंख्यमञ्यानी अगदी सहजपणे जाहीर करून टाकले, की बहीणी प्रमाणेचं भावानाही लाडका भाऊ योजना. मा. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेची जोरदार चर्चा प्रसार माध्यमातून झाली.. गेल्या दोन दिवसात दहावी, बारावी व पदवीधर झालेल्या युवकांचे मला फोन आले, की सर, आम्हांला जरा या नवीन लाडका भाऊ योजनेबाबत माहिती द्याल का ❓याबाबत मी अज्ञानी होतो त्यामुळे त्यानां सांगितले की दोन दिवस थांबा, मी जरा अभ्यास करतो.
माझ्या चौकस बुध्दीनुसार जी मी माहिती काढली ती अशी आहे… मुळात ही योजना पन्नास वर्षापूर्वीची जुनी योजना असून ३ डिसेंबर १९७४ रोजी तत्कालीन सरकारने “पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजना” या नावाने सुरु केली होती. याच योजनेमध्ये काही आवश्यक बदल करून ही योजना जाहीर केलेली आहे.
काय आहे ही योजना?बारावी, आयटीआय वा पदवीधर झालेल्या व वय वर्ष १८ ते ३५ या वयोगटातील बेरोजगार युवकांसाठी ही योजना आहे. अशा युवकांना खाजगी आस्थापना, सामाजिक संस्था, लघु व मध्यम उद्योग अशामध्ये सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधी साठी प्रशिक्षण भत्ता देणारी ही योजना असून १२ वी पास दरमहा सहा हजार, आयटीआय दरमहा बारा हजार आणि पदवीधर दरमहा दहा हजार एवढी स्टायपेन्ड दिली जाणार असून प्रशिक्षण घेतल्यावर त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू करावयाचा आहे. या योजनेचे नाव आहे”मुंख्यमंञी युवा कार्यप्रशिक्षण योजना “.लाडली बहीण योजनेत जसे पाञ लाभार्थीना सरसकट दरमहा पंधराशे रूपये मिळणार तसे या योजनेत मिळणार नाहीत. यासाठी शासनाने फक्त साडेपाच हजार कोटींची तरतूद केलेली असून ज्या पाञ युवकांना ( लाडक्या भावाना) या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यानी संबधित शासनाच्या पोर्टलवर आॅनलाईन नोंदणी करावयाची आहे.
मा. मुख्यमंञ्यांच्या घोषणेनंतर अनेकांनी आपल्या घरात किती भाऊ त्यानुसार गुणाकार केला असेल तर त्यांचा हिशेब चुकणार.. तो चुकू नये म्हणून माझ्या अल्पस्वल्प आकलनानुसार ही माहिती देत आहे. यात काही ञुटी असल्या तर कृपया तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.
______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*
*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍
*(नॅक) मानांकन प्राप्त*
*📘 आमचे कोर्सेस*
▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)
*📕 आमची वैशिष्ट्ये*
स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर
🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट
*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*
🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in
📌 *संचालक मंडळ*
🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत
*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*
*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*