सावंतवाडी :
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा रक्तदाता संघटनेकडून ‘रक्तदान शिबीरा’चं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात तब्बल ५० रक्तदात्यांनी रक्तदान करत पवित्र असं दान केलं. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या रक्तपेढीत हे शिबीर संपन्न झालं. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत रक्तादात्यांचे आभार व्यक्त केले. रक्तदानासारख्या चळवळीत सावंतवाडीतील युवक करत असलेलं काम कौतुकास्पद आहे. रक्तदान करणाऱ्यांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होत. युवा रक्तदाता संघटनेच्या पुढाकारानं सकाळी १० ते २ या वेळेत हे शिबीर संपन्न झालं. दीपकभाई केसरकर मित्रमंडळाची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या शिबीराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी रक्तपेढीत वेळकाळ न बघता रूग्णसेवेसाठी कार्यरत कर्मचारी अनिल खाडे,मानसी बागेवाडी,प्राजक्ता रेडकर, प्रशांत सातार्डेकर, डॉ.पटेल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान, रूग्णसेवेसाठी तत्पर असणारा रूग्णालयाचा सुरक्षारक्षक सुर्यकांत आडेलकर याचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून गंभीर शस्त्रक्रियेदरम्यान तातडीनं रक्तदाते उपलब्ध करुन दिल्याबद्दल व रुग्णालयातील अनेक गंभीर समस्या दुर केल्याबद्दल वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याकडून युवा रक्तदाता संघटना व देव्या सुर्याजी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अँड. निता सावंत-कविटकर म्हणाल्या, देव्या सुर्याजी व त्यांची मित्रमंडळी करत असलेलं कार्य बहुमोल आहे. त्यांच्या कार्याचे वर्णन शब्दांत करता येणार नाही. आमचं सहकार्य आपणास सदैव राहील. आजकाल रक्ताच नातं सुद्धा कामी येत नाही. अशावेळी जात, धर्म, पंथ न बघता माणूसकीचा धर्म युवा रक्तदाता संघटना पाळत आहे. सद्यस्थितीत रूग्णसंख्या वाढत आहे. रक्ताची अधिक आवश्यकता भासत आहे. रक्तपेढीची गरज ओळखून दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिबीर आयोजित केल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी युवा रक्तदाता संघटनेचे आभार मानले.
वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे म्हणाले, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व संघटना वेळोवेळी आमच्यासाठी देवदुतासारखी हजर असते. शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज किती आवश्यक असते याची जाणीव आम्हाला आहे. अशावेळी तातडीनं धाव घेणाऱ्या रक्तदात्यांचे ऋण फेडता न येणारे आहेत. याप्रसंगी मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत रक्तादात्यांशी संवाद साधला. रक्तदानासारख्या चळवळीत सावंतवाडीतील युवक करत असलेलं काम कौतुकास्पद आहे. रक्तदान करणाऱ्यांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. वाढदिवसा निमित्ताने विधायक आसा उपक्रम राबविल्याने रक्तदाते व संघटनेचे आभार त्यांनी मानले.
या शिबिरात तब्बल ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. दोन महिलांचाही यात समावेश आहे. संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी उपस्थितांचे ऋण व्यक्त केले. ज्या ५० दात्यांनी संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत या चळवळीत सहभाग घेतला त्यांचे ऋण व्यक्त केले. याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख अँड निता सावंत-कविटकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, गुणाजी गावडे,डॉ. पांडुरंग वजराटकर, डॉ. गिरीश चौगुले,राजन रेडकर, श्री. हळदणकर, शैलेश मेस्त्री, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, शुभांगी सुकी,अभिनव फाउंडेशनचे किशोर चिटणीस, राजू केळूसकर, अखिलेश कानसे, रवी जाधव, युवा रक्तदाता संघटनेचे मेहर पडते, अर्चित पोकळे, सुरज मठकर, राघवेंद्र चितारी, साईश निर्गुण, संदीप निवळे, प्रतिक बांदेकर, प्रथमेश प्रभू, गौतम माठेकर, देवेश पडते, पांडुरंग वर्दम,अभिजीत गवस,वर्धन पोकळे,संदीप गावडे,रोहीत राऊळ,वसंत सावंत,अनिकेत पाटणकर,मंदार सावंत,पियुष राठोड,जय राणे,अनिकेत सावंत,पंचम खेमराज महाविद्यालयचे सिल्वेस्टर डिसोझा, हार्दीक रेडकर,दिग्विजय मुरगोड, शुभम बिद्रे, गौतम सावंत, शिवानी पाटकर, आबा केसरकर , नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.