*”विठ्ठल नामाचा हो टाहो…” प्राधिकरणातील श्रोते भक्तिरसात चिंब*
*आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलगीतांची रंगली मैफील*
*सावरकर मंडळ आणि अनुप मोरे फाऊंडेशनचा पुढाकार*
पिंपरी, (दि. १७) –
‘विठ्ठल नामाचा हो टाहो…’, ‘हरी भक्तीचा भुकेला…’, ‘अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…’, ‘गोड तुझे रूप.. गोड तुझे नाम…’, अशा भक्तिगीतांमध्ये आकुर्डी, निगडी प्राधिकरणातील भाविकांना साक्षात पांडुरंगाच्या भक्तीची अनुभूती अनुभवायला मिळाली. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आयोजित ‘विठ्ठल ठायी ठायी’ अर्थात ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ या विठ्ठलगीतांच्या मैफलीत श्रोते भक्तिरसात तल्लीन झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि अनुप मोरे सोशल ॲण्ड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक १६ जुलै २०२४ रोजी निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पिंपरी – चिंचवड शहराच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, सामाजिक कार्यकर्ते अविनाश मोरे, राजेंद्र बाबर, मनोज देशमुख, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंड, सचिव सागर पाटील, प्रदीप पाटील, ज्योती कानेटकर, चंद्रशेखर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. विठ्ठलगीतांची अनुभूती घेण्यासाठी प्राधिकरणातील श्रोत्यांनी नाट्यगृह तुडूंब भरले होते.
सर्वत्र आषाढसरी कोसळत असताना ज्ञानेश्वरमाउली, जगद्गुरू संत तुकोबा, संत एकनाथ महाराज, नामदेव महाराज, संत जनाबाई या संतांच्या मांदियाळीपासून ते जगदीश खेबुडकर, पी. सावळाराम, योगेश्वर अभ्यंकर या कवींच्या प्रासादिक रचनांना संगीतकारांनी स्वरसाज चढवून आणि लता मंगेशकर, भीमसेन जोशी, आशा भोसले, किशोरी अमोणकर, सुरेश वाडकर अशा दिग्गज गायकांनी गाऊन अजरामर केलेल्या भक्तिरचनांच्या वर्षावात भाविक चिंब झाले.
डॉ. शशिकला शिरगोपीकर, गौतम मुर्डेश्वर, कुमार करंदीकर, श्रुती करंदीकर, गायत्री सप्रे- ढवळे, सीमा शिरगोपीकर या गायक कलाकारांनी अतिशय तन्मयतेने गायलेल्या लोकप्रिय भक्तिगीतांनी भाविक श्रोत्यांचे वन्स मोअर मिळविले. त्याचवेळी व्यासपीठावर मृणाल भोंगाळे यांनी आपल्या मूर्त-अमूर्त शैलीतील चित्रकलेतून विठ्ठलाची विविध रूपं साकारून मैफलीची रंगत वाढविली; तर गौरी फडके, राधिका देशपांडे, मंजिरी भाके, शशी यादव, पूर्वा साळुंखे, दर्शनी ठाकूर, गीता कुलकर्णी, गायत्री कुलकर्णी, वैदेही शिंदे, जान्हवी मर्ढेकर, आमरुनी पाटील यांच्या पारंपरिक वेशभूषेतील नृत्याविष्काराने आणि अरुण गवई (तबला), विनीत तिकोनकर (पखवाज), अनय गाडगीळ (की बोर्ड), धनंजय साळुंखे (तालवाद्य) यांनी नेटकी साथसंगत करीत मैफलीला श्रवणीय केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, अनुप मोरे सोशल ॲण्ड स्पोर्ट्स फाउंडेशन, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, सुसंगती ज्येष्ठ नागरिक संघ, नुपूर नृत्यालय आणि नृत्यांजली कथ्थक क्लास या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात सहकार्य केले. स्नेहल दामले यांनी आपल्या रसाळ निवेदनाने श्रोत्यांची विशेष दाद मिळविली.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात
*🍀प्रवेश सुरू…!! प्रवेश सुरू…!!प्रवेश सुरू…!!🍀*
_सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_
_डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._
*📌छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस📌*
कॉलेज कोड – 11164
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि
डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..
उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत कृषी क्षेत्रात उज्वल भविष्य घडवा…
*[B. Sc. (Agri) कृषी पदवी*
*Qualification – 12th Science pass (PCB/PCBM) MHT-CET/ JEE/NEET]*
*(B. Sc. Agri (Hon) कृषी पदवी)*
*📚अभ्यासक्रम कालावधी- 4 वर्ष (8 सत्र)*📚
♦️ *पात्रता- 12 वी (विज्ञान शाखा उत्तीर्ण)*♦️
*(भौतिकशास्त्र, रासायनशास्त्र, जिवशास्त्र/ गणित)*
*प्रवेश प्रक्रिया – ऑनलाईन*
https://sanwadmedia.com/142095/
*(महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध)*
*प्रवेश क्षमता – 90 विद्यार्थी*
*🌴महाविद्यालयाची वैशिष्ठये🌴*
🌳सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त पदवी महाविद्यालय.(22 वर्ष)
🌳 मुंबई गोवा हायवे पासून फक्त 1 कि.मी.च्या अंतरावर व सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून 2 कि.मी. च्या अंतरावर
🌳 मागील 4 वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची रँकिंग – IBPS, MBA, M.Sc. व स्पर्धा परीक्षेतून विविध पदावर निवड
🌳 नैसर्गिकशेती प्रशिक्षण केंद्र समृद्ध व आनंदी गाव योजनेचे केंद्र.
🌳 उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.
🌳 संगणक इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणारे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.
🌳 कॅम्पस इंटरव्यू द्वारे रोजगाराच्या / नोकरीच्या संधी उपलब्ध.
🌳 मागास विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ.
🌳 आर्थिक मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती.
🌳 एकमेव कृषी महाविद्यालय जेथे NCC / NSS उपलब्ध.
🌳 कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण.
🌳 खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती प्रकल्प अंतर्गत फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे विद्यार्थ्यांना मोफत
*📲_*अधिक माहिती साठी संपर्क*_
🔴 Principal – (CSCAKO)
Prof. Yogesh Pednekar
*📲 9420360912 | 9373724192*
🔴 Asso. Professor
Mahesh L. Parulekar
*📲 9422373717*
🔴 Sr. Clerk
Dhondu Colwankar
*📲 9421266607*
🔴 Accountant
Santosh P. Sawant
*📲 9322707214*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*