तेरेखोल नदी क्षेत्रातील रहिवाशांना सतर्कचे आदेश
दोडामार्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडलेली असून सदर नदीचे संपर्कात येत असलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.कोणीही पाणी असलेल्या रस्त्यांवरून , पुलावरून वाहतूक करू नये, तसेच नदीचे, पुराचे पाण्यात जावू नये.अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 02362/228847, मोबाईल 7498067835, सावंतवाडी तहसील नियंत्रण कक्ष (02363)272028, जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष (02362 )228614 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग मार्फत करण्यात येत आहे.