You are currently viewing मन लहरी उनाड…

मन लहरी उनाड…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

 

*मन लहरी उनाड….*

 

मन लहरी उनाड

धजे कुवतीच्या पार…

जसं तुटता दावण

ढोर धावे सैरभैर…। १.

 

मन पाखराच्यावाणी

करे वारी दूरदूरी…

परी इवलासा जीव

करे स्वारी उंटावरी…। २.

 

भरे उडाण कधी ती

सातासमुद्राच्या पारी…

जशी आंगात तयाच्या

आली वाघाची सवारी…। ३.

 

पिते मिटुनिया डोळे

दूध मांजराची जात …

तसं भाषा ती तनाची

मन समजे हो खात…। ४.

 

करे उडउड फार

व्यर्थ असेची बेकार…

कधी लालसेच्या पाशी

बने पारध-शिकार…। ५.

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख©®

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा