You are currently viewing दीपक केसरकर यांच्याकडून वेळागर वासियांवर अन्याय; संघर्ष समिती अध्यक्ष आजू अमरे

दीपक केसरकर यांच्याकडून वेळागर वासियांवर अन्याय; संघर्ष समिती अध्यक्ष आजू अमरे

*दीपक केसरकर यांच्याकडून वेळागर वासियांवर अन्याय;
संघर्ष समिती अध्यक्ष आजू अमरे*

वेंगुर्ले

स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प, विकास करण्यात अर्थ नाही असे म्हणणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील 39 सर्वे नंबर व 9 हेक्टर क्षेत्र प्रकल्पातून वगळण्याबाबत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने राहून शेतकऱ्यांना न्याय का दिला नाही असा प्रश्न आम्हा वेळागरवासीयांच्या मनात निर्माण झाला आहे.
1996 मध्ये शिरोडा वेळागर येथील जमिनी पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून शासनाने ताब्यात घेतल्यास यामध्ये स्थानिक रहिवाशांची घरे असलेले सर्वे नंबर देखील ताब्यात घेण्यात आले त्यानंतर आम्ही स्थानिक रहिवाशांनी सदर पर्यटन प्रकल्पाला आमचा कुठलाही विरोध नाही परंतु आमची घरी असलेले सर्वे नंबर 39 व 9 हेक्टर क्षेत्र यामधून वगळण्यात यावे यासाठी शासनाचे 1996 पासून आतापर्यंत उपोषण, निवेदने, मोर्चे काढून शासनाचे व लोकप्रतिनिधींचे वेळोवेळी लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न केले परंतु याबाबत आमच्या मागणीप्रमाणे सर्वे नंबर 39 व 9 हेक्टर क्षेत्र वगळल्या बाबत आम्हाला अद्याप पर्यंत कुठल्याही कायदेशीर मार्गाने कळविण्यात आलेली नाही.
1996 पासून आतापर्यंत आमच्या विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आलेल्या एकाही आमदाराने आम्हा वेळागरवासीयांना अद्याप पर्यंत न्याय दिलेला नाही विद्यमान आमदार व राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतेच आजगाव येथील मायनिंग बाबत आपली भूमिका स्पष्ट करताना स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प, विकास करण्यात अर्थ नाही व स्थानिकांसोबत राहण्याचे स्पष्ट केले परंतु आमदार दीपक केसरकर हे आम्हा वेळागरवासीयांवर अन्याय का करत आहेत असा प्रश्न आम्हा ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.

नुकत्याच सासोली येथील प्रकरणाबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तेथील शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचे सांगत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले यामुळे तेथील स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे याप्रमाणेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वेळागर प्रश्न योग्य पद्धतीने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतल्यास आम्हालाही न्याय मिळू शकेल.

गेल्या पंधरा वर्षाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये आम्हाला योग्य न्याय न देऊ शकलेल्या विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी पुढील विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ मायनिंग प्रश्न शेतकऱ्यांना नुसते आश्वासित न करता तेथील मायनिंग प्रकल्प रद्द करून द्यावा व आम्हा वेळागरवासीयांना देखील सर्वे नंबर 39 व 9 हेक्टर जमीन वगळल्याचे कायदेशीर आदेश परिपत्रक काढून द्यावे अशी आमची वेळागर वासियांची मागणी आहे असे संघर्ष समितीचे अध्यक्ष आजू अमरे यांनी स्पष्ट केले आहे .

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)

*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*

*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍

*(नॅक) मानांकन प्राप्त*

*📘 आमचे कोर्सेस*

▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)

*📕 आमची वैशिष्ट्ये*

स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर

🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट

*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*

🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in

📌 *संचालक मंडळ*

🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत

*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*

*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा