*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वारी….*
वारकरी परंपरा,
महाराष्ट्र देशी असे!
विठ्ठलाच्या सान्निध्यात,
संत मांदियाळी वसे!….१
पंढरपुरी वारी जाई,
विठ्ठलाच्या दर्शनाला!
जाती पाय वेगे वेगे,
आतुरले ते भेटीला!….२
विठु राहे पंढरीत,
जमे भक्तांचा मेळावा!
माहेराची ओढ जशी ,
लागते लेकीच्या जीवा !….३
चाहूबाजू येती सारे,
टाळ, चिपळ्या घेऊन!
विठ्ठलाची गाणी गाता,
मन जाई ते रंगून !….४
आषाढाची वारी येता,
वारकऱ्या ओढ लागे!
भेटीस आतुर होई,
पांडुरंगी मन वेडे !….५
वारी निघे पंढरीला,
कानी टाळांचा गजर!
वेग येई पावलांना,
राऊळी लागे नजर!…६
, जसा जसा मार्ग सरे,
मन होई वेडे पिसे!
डोळ्यापुढे मूर्ती येई,
विठ्ठल सर्वत्र भासे!…७
उज्वला सहस्रबुद्धे, पुणे