You are currently viewing पंढरीची वारी

पंढरीची वारी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम अभंग रचना*

 

*पंढरीची वारी*

*************

आषाढ महिना | पावसाच्या सरी|

लगबग करी| वारकरी॥१॥

 

चालत रहाणे| अडचणी येती|

मात त्यावरती|करी भक्त॥२॥

 

कधी भेटशील| मज पांडुरंगा

आस दर्शनाची| पुरवावी॥३॥

 

मनी मोदभरे|देखुनी पंढरी|

चंद्रभागातिरी भक्तगण॥४॥

 

हाती झांजा टाळ| पाऊले तालात|

कशी पडतात| तोच जाणे॥५॥

 

तुळशीची माळ| कपाळाला बुक्का |

हातात पताका| शोभतात ॥६॥

 

पुढल्याही वर्षी |असाच येईन|

माथा टेकवीन| पायावरी॥७॥

 

विद्या रानडे

प्रतिक्रिया व्यक्त करा