*केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यासाठी घेतला पुढाकार*
अमरावती
कृषी क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न ही उपाधी मिळण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. ते माझे कर्तव्यच आहे. आपण फक्त एक प्रस्ताव तयार करून माझ्या दिल्लीच्या बंगल्यावर या. आपण सर्व शक्तीनिशी डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. असे उद्गार केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे काढले. शिक्षण महर्षी व कृषी महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार यासाठी पुढाकार घेणारे दिल्लीच्या अखिल भारतीय कुर्मी महासभेचे केंद्रीय सदस्य व सुप्रीम कोर्टाचे सीनियर एडवोकेट श्री के के चौधरी व डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांची त्यांच्या नागपूर निवासस्थानी भेट घेतली असता त्यांनी हे आश्वासन दिले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचे विश्वासू सहकारी श्री सुधीर दिवे तसेच मराठा सेवा संघाचे पदाधिकारी श्री बाळासाहेब ठेंग हे उपस्थित होते.डॉ पंजाबराव देशमुख यांनी केवळ महाराष्ट्रासाठी नाहीच तर संपूर्ण देशात कृषी क्षेत्रात व शिक्षण क्षेत्रात भरीव काम केलेले आहे. ते भारत देशाचे कृषी राज्यमंत्री असताना त्यांनी केलेले कार्य आजही चर्चिले जात आहे .विपरीत परिस्थिती असताना त्यांनी ह्या सर्व बाबी केलेल्या आहेत. 1932 या वर्षी शिक्षणाची गंगा विदर्भात आणण्यासाठी त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. आज या संस्थेचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. अशा या महापुरुषाला भारतरत्न ही उपाधी देण्यात यावी यासाठी एडवोकेट के के चौधरी या दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाच्या सीनियर एडवोकेटने पुढाकार घेतला आहे . त्यांनी त्यानिमित्त अमरावतीला येऊन सर्व संबंधिताची भेट घेऊन नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना याची माहिती दिली. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न ही उपाधी देण्यास हिरवी झेंडी दाखवली असून प्रस्ताव दाखल करण्यास सांगणे ही महत्त्वपूर्ण बाब काल घडून आलेली आहे. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतल्यामुळे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न उपाधी मिळण्याचा मार्ग सुकर झालेला आहे .त्यांनी घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रकाशनार्थ प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी अमरावती 9890967003
______________________________
*संवाद मीडिया*जाहिरात
*🍀प्रवेश सुरू…!! प्रवेश सुरू…!!प्रवेश सुरू…!!🍀*
_सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_
_डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._
*📌छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस📌*
कॉलेज कोड – 11164
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि
डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..
उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत कृषी क्षेत्रात उज्वल भविष्य घडवा…
*[B. Sc. (Agri) कृषी पदवी*
*Qualification – 12th Science pass (PCB/PCBM) MHT-CET/ JEE/NEET]*
*(B. Sc. Agri (Hon) कृषी पदवी)*
*📚अभ्यासक्रम कालावधी- 4 वर्ष (8 सत्र)*📚
♦️ *पात्रता- 12 वी (विज्ञान शाखा उत्तीर्ण)*♦️
*(भौतिकशास्त्र, रासायनशास्त्र, जिवशास्त्र/ गणित)*
*प्रवेश प्रक्रिया – ऑनलाईन*
https://sanwadmedia.com/142095/
*(महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध)*
*प्रवेश क्षमता – 90 विद्यार्थी*
*🌴महाविद्यालयाची वैशिष्ठये🌴*
🌳सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त पदवी महाविद्यालय.(22 वर्ष)
🌳 मुंबई गोवा हायवे पासून फक्त 1 कि.मी.च्या अंतरावर व सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून 2 कि.मी. च्या अंतरावर
🌳 मागील 4 वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची रँकिंग – IBPS, MBA, M.Sc. व स्पर्धा परीक्षेतून विविध पदावर निवड
🌳 नैसर्गिकशेती प्रशिक्षण केंद्र समृद्ध व आनंदी गाव योजनेचे केंद्र.
🌳 उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.
🌳 संगणक इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणारे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.
🌳 कॅम्पस इंटरव्यू द्वारे रोजगाराच्या / नोकरीच्या संधी उपलब्ध.
🌳 मागास विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ.
🌳 आर्थिक मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती.
🌳 एकमेव कृषी महाविद्यालय जेथे NCC / NSS उपलब्ध.
🌳 कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण.
🌳 खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती प्रकल्प अंतर्गत फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे विद्यार्थ्यांना मोफत
*📲_*अधिक माहिती साठी संपर्क*_
🔴 Principal – (CSCAKO)
Prof. Yogesh Pednekar
*📲 9420360912 | 9373724192*
🔴 Asso. Professor
Mahesh L. Parulekar
*📲 9422373717*
🔴 Sr. Clerk
Dhondu Colwankar
*📲 9421266607*
🔴 Accountant
Santosh P. Sawant
*📲 9322707214*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*