You are currently viewing सरंबळ येथे दरड खचल्याने ३ घरांना धोका…

सरंबळ येथे दरड खचल्याने ३ घरांना धोका…

सरंबळ येथे दरड खचल्याने ३ घरांना धोका…

नुकसानग्रस्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले…

कुडाळ

सरंबळ येथे दरड खचल्याने परिसरातील ३ घरांना धोका निर्माण झाला आहे. डोंगरातील पाणी घराच्या चक्क भिंतीतून घरातून वाहू लागल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. दरम्यान याबाबतची माहिती प्रशासनाला समजल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी भेट दिली व त्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. रमाकांत परब, गुरुनाथ परब व भानू परब अशी त्या नुकसानग्रस्त कुटुंबाची नावे आहेत. त्यांना पर्यायी स्थळी हलविण्यात यासाठी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा