वैभववाडी
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्यकर्ते अभिजित उर्फ राजू पवार यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच सौ. रोहिता रवींद्र पवार यांनीही भाजपात प्रवेश केला. येथील पक्ष कार्यालयात मंडळ अध्यक्ष नासीर काझी यांच्या उपस्थितीत श्री. पवार हे स्वगृही परतले आहेत.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, राजा राणे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किशोर दळवी, बंड्या मांजरेकर सोशल मीडिया प्रमुख बाबा कोकाटे, विनोद रावराणे, नवलराज काळे, अनंत फोंडके, प्रवीण रावराणे, ज्ञानदेव पवार प्रवीण पवार, शार्दुल देसाई आदी उपस्थित होते.
राजू पवार हे एडगांव गावचे सुपुत्र आहेत. काही महिन्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत श्री. पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी पुन्हा एकदा भाजपचे कमळ हाती घेतले आहे. गावच्या सेवा सोसायटीत ते संचालक पदावर कार्यरत आहेत. सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. यावेळी नासीर काझी म्हणाले, राजू पवार यांचा पक्षात योग्य तो सन्मान होईल. तसेच तालुक्यात पक्ष प्रवेश मालिका यापुढेही काही दिवस सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.