*पाऊले चालती पंढरीची वाट….!*
*भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी घडवली सांगेलीतील वारकऱ्यांना मोफत पंढरपूर वारी*
आषाढी एकादशीला विठ्ठलभक्त वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागते. वादळवाऱ्याची, पावसांच्या तुफानी आषाढधारांची पर्वा न करता विठ्ठलदर्शनासाठी पंढरीच्या वारीसाठी विठ्ठलभक्त धाव घेत असतात. काही भक्तांना पायी चालत वारी करणे शक्य होत नाही, पण विठ्ठलदर्शनाची आस शांत राहू शकत नाही, अशा सांगेली येथील वारकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी भाजपा युवामोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी मोफत पंढरपूर वारीची व्यवस्था केली आहे.
या उपक्रमामुळे अनेक वारकरी सुखावले असून त्यांनी विशाल परब यांना हृदयातून आशीर्वाद दिले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण आणि खा. नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवला जाण्यासाठी योग्य ते नियोजन केले जाईल, असे विशाल परब यांनी स्पष्ट केले आहे. सांगेली ग्रामस्थांनी भाजपाच्या वतीने विशाल परब यांनी राबवलेल्या या अभिनव संकल्पनेचे कौतुक केले आहे.
वारकऱ्यांच्या वाहनांचा भगव्या ध्वजाने शुभारंभ करत त्यांना वारीतील सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, भाजपा सोशल मिडिया प्रमुख श्री केतन आजगावकर, भाजपा ओबीसी सेलचे दिलीप भालेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, सांगेलीचे माजी उपसरपंच वामन नार्वेकर, दीपक राऊळ, सुनील सावंत, सिताराम मांजरेकर, अमित राऊळ, संतोष नार्वेकर, सचिन नार्वेकर, दिलीप नार्वेकर, सुनील राऊळ, बाळा राऊळ, अजय मेस्त्री, विजय गावडे, न्हानू राऊळ, बाबी चव्हाण, महेश सांगलेकर, प्रकाश रेडीज, शिवराम सावंत, सोमनाथ राऊळ, बापू रेडीज, सांगलेकर, सुरेश वांजीवले, अनिल राऊळ, गुरुप्रसाद राऊळ आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.