You are currently viewing सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याचा बांदा नवरात्र उत्सव मंडळाकडून आषाढ महोत्सव निमित्ताने भव्य सत्कार

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याचा बांदा नवरात्र उत्सव मंडळाकडून आषाढ महोत्सव निमित्ताने भव्य सत्कार

*सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याचा बांदा नवरात्र उत्सव मंडळाकडून आषाढ महोत्सव निमित्ताने भव्य सत्कार.*

बांदा

सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कट्टा कॉर्नर बांदा आषाढ महोत्सव 2024 निमित्ताने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या मंडळाला आज 35 वर्षे पूर्ण झालेली आहे सर्वप्रथम अशा प्रकारचे कार्यक्रम माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी सुरू केले होते यामध्ये सांस्कृतिक मनोरंजनचे कार्यक्रम, समाज प्रबोधन विद्यार्थी व अनेक सेवाभावी संस्थांची सत्कार त्यांच्या माध्यमातून होत परंतु आता सदर कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून व्हावे यासाठी पुढाकार घेऊन सदर कार्यक्रम आषाढ महोत्सव 2024 या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुरू केले.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट सामाज सेवा करणाऱ्या संस्थेचा तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात येतो. दहावी बारावी शालांत परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम आलेली कुडाळ येथील अर्पिता सामंत हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच यश जीवबावीर, चैतन्य बांदेकर तसेच श्रुती तळगावकर या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बांदा वाफोली येथील जनजीवन विस्कळीत झाले होते अशावेळी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून 74 कुटुंबीयांना महिनाभर पुरेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते तसेच 2023 मध्ये पुन्हा झालेल्या अतिवृष्टीमध्ये बांदा बाजारपेठ येथे रात्री एक ते पहाटे चार पर्यंत लोकांना मदत कार्य केले होते या सामाजिक कार्याची दखल घेऊन मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
मंडळ दरवर्षी आषाढ महोत्सव निमित्ताने विविध उपक्रम राबवून अशाच प्रकारची कौतुकाची थाप देत असते त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना अजून चांगलं कार्य करण्यासाठी स्फूर्ती व प्रेरणा मिळते.
या मंडळाच्या वतीने दहावी मध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, सचिव समीरा खलील, रवी जाधव, रूपा मुद्राळे व सुजय सावंत यांचाही सत्कार करण्यात आला.
या मंडळाचे अध्यक्ष संजय नाईक, शिक्षण सभापती तथा रोटरी अध्यक्ष प्रमोदभाई कामत, ग्रामपंचायत सभासद व मंडळाचे आधारस्तंभ विनायक भाई दळवी, उपाध्यक्ष प्रवीण शिरसाट, भाऊ वळंजु, माजी अध्यक्ष शशी पित्रे सल्लागार, श्वेता कोरगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजप महिला जिल्हाध्यक्ष, भालचंद्र केळुस्कर, बुवा तुकाराम गावडे, ज्येष्ठ दशावतार आनंद गवस उद्योजक ,अपेक्षा नाईक सरपंच मंडळाचे कार्यकर्ते समीर सातार्डेकर, भाई वाळके, साई काणेकर इत्यादी या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते. हा कार्यक्रम आनंदी हॉल बांदा येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध मालवणी समालोचक बागल चौधरी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार बाळा आकेरकर यांनी मानले.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*🍀प्रवेश सुरू…!! प्रवेश सुरू…!!प्रवेश सुरू…!!🍀*

_सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_
_डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._

*📌छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस📌*
कॉलेज कोड  – 11164

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि
डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..
        उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत कृषी क्षेत्रात उज्वल भविष्य घडवा…

*[B. Sc. (Agri) कृषी पदवी*
*Qualification – 12th Science pass (PCB/PCBM) MHT-CET/ JEE/NEET]*

*(B. Sc. Agri (Hon) कृषी पदवी)*
*📚अभ्यासक्रम कालावधी- 4 वर्ष (8 सत्र)*📚

♦️ *पात्रता- 12 वी (विज्ञान शाखा उत्तीर्ण)*♦️
*(भौतिकशास्त्र, रासायनशास्त्र, जिवशास्त्र/ गणित)*

*प्रवेश प्रक्रिया – ऑनलाईन*
https://sanwadmedia.com/142095/
*(महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध)*

*प्रवेश क्षमता – 90 विद्यार्थी*

*🌴महाविद्यालयाची वैशिष्ठये🌴*

🌳सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त पदवी महाविद्यालय.(22 वर्ष)

🌳 मुंबई गोवा हायवे पासून फक्त 1 कि.मी.च्या अंतरावर व सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून 2 कि.मी. च्या अंतरावर

🌳 मागील 4 वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची रँकिंग – IBPS, MBA, M.Sc. व स्पर्धा परीक्षेतून विविध पदावर निवड

🌳 नैसर्गिकशेती प्रशिक्षण केंद्र समृद्ध व आनंदी गाव योजनेचे केंद्र.

🌳 उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.

🌳 संगणक इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणारे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.

🌳 कॅम्पस इंटरव्यू द्वारे रोजगाराच्या / नोकरीच्या संधी उपलब्ध.

🌳 मागास विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ.

🌳 आर्थिक मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती.

🌳 एकमेव कृषी महाविद्यालय जेथे NCC / NSS उपलब्ध.

🌳 कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण.

🌳 खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती प्रकल्प अंतर्गत फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे विद्यार्थ्यांना मोफत

*📲_*अधिक माहिती साठी संपर्क*_
🔴 Principal – (CSCAKO)
Prof. Yogesh Pednekar
*📲 9420360912 | 9373724192*

🔴 Asso. Professor
Mahesh L. Parulekar
*📲 9422373717*

🔴 Sr. Clerk
Dhondu Colwankar
*📲 9421266607*

🔴 Accountant
Santosh P. Sawant
*📲 9322707214*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा