व्ही.एन.नाबरच्या पालक शिक्षक संघाची पहिली सभा संपन्न..
बांदा
बांदा पंचक्रोशीत वसलेल्या व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सभागृहात चालू वर्षाची पालक शिक्षक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी प्रशालेचे चेअरमन श्री.मंगेश रघुनाथ कामत तसेच श्री.त्रिविक्रम उपाध्ये, सेक्रेटरी श्री.बी. सातारकर त्याचबरोबर स्कूल कमिटी व गव्हर्निंग कांऊनसिलच्या सदस्यांपैकी श्री. सुधाकर डेगवेकर,श्री. मनोज कामत,श्री.सुरेश गावडे,श्री.सुरेश गोवेकर, श्री.राजेश गोवेकर
तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई उपस्थित होत्या.
या सभेची सुरूवात यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून झाली.प्रशालेची विद्यार्थीनी कु.सायमा आगा ९४ % मिळवून प्रशालेत प्रथम आली तर विद्यार्थी कु.पियूष गाड व कु.गुरूदास गवंढळकर यांनी ९०% प्राप्त करून दुसरा क्रमांक प्राप्त केला तर शाळेचा विद्यार्थी कु.प्रशांत गवस याने ८९.२० % प्राप्त करून शाळेत तिसरा येण्याचा मान मिळवला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेतील
विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.यामध्ये इयत्ता पाचवी मध्ये कु.चैतन्य मनोज महाबळ व कु.माधव सुधाकर डेगवेकर तर आठवीतील कु.अनुष्का रामचंद्र तेली व कु.सुयश संदिप गावकर या विद्यार्थ्यांनी स्काॅलरशिप परिक्षेत घवघवीत यश संपादन करून शिष्यवृत्ती प्राप्त केली होती.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे व्यासपिठावरील सर्व मान्यवरांनी कौतुक केले.त्यानंतर शाळेतील एम.एस.एफ.सी.चे शिक्षक श्री भुषण सावंत यांनी या कोर्स संबंधी पालकांना माहिती दिली, जेणेकरून आपले पात्य दैनंदिन अभ्यासा व्यतिरिक्त आपल्या शाळेत काय आहे याचीही प्रचिती होईल.या सभेचे मुळ औचित्य साधून या संघासाठी नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालकांपैकी एक पालक प्रतिनिधी निवडण्यात आला.शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षपदी श्री दौलतराव महादेव देसाई यांची निवड करून पालक शिक्षक संघाची स्थापना झाली. गतवर्षी चे उपाध्याक्ष श्री.सुनिल राऊळ हे ह्यावर्षी इनवायटी म्हणुन काम पाहतील.यावेळी श्री सुरेश गावडे,श्री मनोज कामत, श्री सुधाकर डेगवेकर यांनी आपले विचार मांडताना शाळेचे भरभरून कौतुक केले.
व १७ वर्षांची १००% निकालाची परंपरा पुढेही अशीच चालू राहण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
व शाळेविषयी ऐकू येणाऱ्या अफवांना बळी पडू नका तर स्वतः आपल्या पाल्याचे उज्वल भविष्याचा विचार करत असाल तर व्ही एन नाबर शाळाच अती उत्तम आहे आणि येथील मॅनेजमेंट, शिक्षक व पालक या त्रिमितीय घटकांनी कठीण परिस्थितही एकजुट दाखवून ते सिद्ध केले आहे असे उद्गारही यावेळी चेअरमन श्री. मंगेश कामत यांनी काढले.
शाळेत दखल झालेल्या प्रत्येक मुलाचे भविष्य कसे उज्वल होईल व तो विद्यार्थी यशाची शिखरे पादाक्रांत करताना येणाऱ्या अडचणीवर मात करून कसा पुढे जाईल याच विचारात असणारे नर्सरी ते दहावीपर्यंतच्या अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षकांची कौतुकाने पाठ थोपटली .शाळेचे नविन मॅनेजर श्री. उपाध्ये यांनी आपण ह्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी जे उपक्रम राबवणार आहे त्याची कुठेही वाच्यता करणार नाही असेही उद्गार काढले.शाळेला वेळोवेळी मदत करणारे शाळेचे हितचिंतक श्री. शशि पित्रे व भाऊ वळंजू यांचे वेळोवेळी शाळेला मार्गदर्शन लाभते.
सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी, सुत्रसंचालन शिक्षिका सौ स्नेहा नाईक तर आभार शिक्षिका सौ. शिल्पा कोरगावकर यांनी मानले व पालक प्रतिनिधी निवडताना शिक्षिका रसिका वाटवे, कल्पना परब,सुप्रिया पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी शाळेचे इतर सर्व शिक्षक,व पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.वंदे मातरम म्हणून सभेची सांगता झाली.