कणकवली बाजारपेठमध्ये विद्युत पोलवर तारा एकमेकांना चिकटल्या,सुदैवाने पुढील अनर्थ टळला..
कणकवली
येथील बाजारपेठमध्ये शिरसाट कापड दुकाननजीकच्या विद्युत पोलवर असलेल्या तारा एकमेकांना चिकटल्याने शॉर्ट होऊन धूर येऊ लागला. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली होती. लागलीच तातडीने कणकवली नगरपंचायतचा अग्निशमन बंब घेऊन चालक गणेश लाड व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र विद्युत पुरवठा सुरू असल्याने यावर काही उपाययोजना करता येत नव्हती. दरम्यान महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री. शिंदे यांना सदरील घटनेची माहिती देण्यात आली. लागलीच श्री. शिंदे यांनी तात्काळ दखल घेत वायरमनच्या मदतीने विद्युत पुरवठा खंडित केला. सुदैवाने या तारांमधून शॉर्ट सर्किटमुळे धूर येत असल्याचे निदर्शनास आल्याने अनर्थ टाळला. ही घटना सोमवारी सकाळी ६:४५ वा. च्या सुमारास घडली. घटनास्थळी अनेकांनी धाव घेतली होती. मात्र वेळीच विद्युत पुरवठा खंडित केल्याने पुढील प्रसंग टाळला.