*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम अभंग रचना*
*वारी पंढरीची* 🚩
पंढरीच्या वाटे / निघे वारकरी
मनात श्रीहरी / पांडुरंग
ज्ञानोबा पालखी / आश्र्वाचे रिंगण
दाटे त्रिभुवन / पंढरीत
पांडुरंग हरी / एकच भजन
गाती सुसज्जन / मंदीरात
रूप मनोहर. /विठाई माऊली
भक्तांची साऊली./ अंतरात
पांडुरंग दारी /मन होई दंग
विठाईच्य संग / मंदीरात
टाळ वीणा वाजे / भजनी किर्तनी
विठ्ठल चरणी /जीव लागे
काकडा आरती/ राम प्रहराला
गाऊ आरतीला /पांडुरंग
वैकुंठ नगरी / ब्रम्हांड भुवरी
दिसते पंढरी /स्वर्ग सुख
*शीला पाटील. चांदवड.*