*बांदा नं.१ केंद्र शाळेचे विद्यार्थी शेतीच्या बांधावर*
*आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी घेतला भातलागवडीचा अनुभव*
*बांदा*
*बिनभिंतीची उघडी शाळा , लाखो इथले गुरू,*
*झाडे,वेली,पशु,पक्षी ,पाखरे*
*यांच्याशी गोष्टी करू*
असे महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी म्हटलेले आहे याच निसर्गाच्या सान्निध्यात पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेचेच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत एक दिवस बांधावरच शाळा भरवून आनंददायी शनिवार साजरा केला. या वेळी विद्यार्थ्यांनी भात लागवडीच्या प्रत्यक्ष अनुभव घेतला.
आपल्या कृषीप्रधान भारत देशात शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.जवळपास ७० टक्के लोक शेती करत असतात.शालेय वयातच विद्यार्थ्यांना शेतीची आवड निर्माण व्हावी व श्रमप्रतिष्ठा वाढीस लागावी यासाठी या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली होती.बांधावरच्या या शाळेत विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी शेतात उतरून भात लागवडीच्या अनुभव घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकरी मुलाखतीततून त्यांच्या कार्याची माहिती करुन घेतली ,शेतकरी व पावसाची गीते सादर केली यावेळी चिखलात मनमुराद खेळण्याचा आनंदही विद्यार्थ्यांनी लुटला.यादिवशी विद्यार्थ्यांनी शेतीच्या बांधावरच अल्पोपहार आस्वाद घेतला.
चाकोरीबद्ध शिक्षणाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या मनात बळीराजा बद्दल,आदर निर्माण व्हावा ,श्रमाचे महत्त्व कळावे, शेतीच्या आधुनिक तसेच पारंपरिक पद्धती ,खते किटकनाशके यांची ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम राबविला असल्याचे मत मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी व्यक्त केले
सदर उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी पदवीधर शिक्षिका स्नेहा घाडी, उपशिक्षक जे.डी.पाटील, फ्रान्सिस फर्नांडिस,कृपा कांबळे, रसिका मालवणकर ,शुभेच्छा सावंत ,जागृती धुरी, कृपा कांबळे ,विनिता गोसावी आश्लेषा कांबळे, मनिषा काळे, मृणाल परब यांनी विशेष परिश्रम घेतले.