You are currently viewing केंद्र शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे

केंद्र शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे

*मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री पुरुषोत्तम खेडेकर यांची मागणी*

 

अमरावती :

 

शिक्षण मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे. इतके भरीव काम त्यांनी आपल्या हयातीत संपूर्ण भारतासाठी केलेले आहे. शेतकऱ्यासाठी तळमन-धनाने काम करणारे खूप कमी लोक आहेत. अशा उपेक्षित शेतकऱ्यांना सदा सर्वदा योग्य मार्गदर्शन व त्यांच्यासाठी हितचिंतक म्हणून ठरलेले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतरत्न ही उपाधी देऊन गौरवांकित करावे. असे उद्गार मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी आज अमरावती येथे काढले. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न उपाधिने गौरविण्यात यावे यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी दिल्ली दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाचे सीनियर एडवोकेट सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट श्री के के चौधरी अमरावतीला आले असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या सभेला मार्गदर्शन करताना श्री खेडेकर हे बोलत होते. स्थानिक विद्यापीठ रोडवरील महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगरात सुप्रसिद्ध वक्त्या व लेखिका प्रा डॉ. अलका लुंगे गायकवाड यांच्याकडे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये या विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली .या सभेची सुरुवात मराठा सेवा संघाचे माजी सरचिटणीस व डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी चे संस्थापक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी प्रास्ताविक करून केली. या सभेमध्ये सर्वानुमते पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न ही उपाधी मिळण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात यावेत असे ठरविण्यात आले. तसेच वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून व सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याने हे अभिमान राबविण्याचे ठरविण्यात आले. या सभेला मराठा सेवा संघाचे सदस्य श्री प्रकाश देशमुख सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.व्ही टी इंगोले प्रा. डॉ. हरिहर लुंगे प्रा.डॉ. अलका लुंगे श्री विक्रम भेंडे तुषार काठोळे वैशाली गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या अमरावती आगमनामध्ये एडवोकेट कमलाकांत चौधरी यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन देशमुख यांना जरूड येथे जाऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्याविषयीच्या अभियानाची माहिती दिली .तसेच त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एडवोकेट जे व्ही पाटील पुसदेकर एडवोकेट गजानन पुंडकर अकोट कोषाध्यक्ष श्री दिलीप इंगोले कार्यकारी सदस्य श्री हेमंत काळमेघ सचिव डॉक्टर वि गो ठाकरे तसेच अमरावतीचे माजी पालकमंत्री व माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांची भेट घेऊन व त्यांना दूरध्वनी वरून या अभियानाची माहिती दिली. डॉ सुनील देशमुख यांनी या कामी आपण पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले.केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचे देखील सहकार्य या कार्यात घेण्याचे ठरविण्यात आले. एडवोकेट के के चौधरी यांनी आपल्या तीन दिवसाच्या अमरावती भेटीत स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्था डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे स्मृती केंद्र श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय व डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाला भेटी देऊन पंजाबराव देशमुख जे भरीव कार्य करून गेले आहेत त्याची माहिती घेतली. या सभेमध्ये पंजाबरावांना भारतरत्न उपाधी देण्याविषयी लवकरच एका सभेचे आयोजन करण्यात येणार असून अमरावती मधील लोकांनी या कामी पुढाकार घ्यावा असे आवाहन एका परिपत्रकातून करण्यात आले आहे.

प्रकाशनार्थ :

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक

डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा