मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवार आस्थापना यांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपली नोंदणी करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यास दि. 9 जुलै 2024 च्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यांत आलेली आहे.
त्यानुसार 12 वी पास उमेदवारांना दरमाह रु.6 हजार,आयटीआय पास रु. 8 हजार व पदवी व पदव्युत्तर पास रु.10 हजार विद्यावेतन सहा महिन्यांसाठी दिले जाणार आहे.
या योजनेकरीता उमेदवाराची पात्रतापुढीलप्रमाणे, उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वय किमान 18 व कमाल 35 वर्ष असावे. या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाईल, हे प्रशिक्षण घेतलेल्यांना उद्योजक उमेदवार योग्य वाटल्यास रोजगार देतील. प्रशिक्षणार्थीना किमान वेतन कायदा, राज्य सरकार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा प्रशिक्षणाच्या काळात लागू असणार नाही.
ज्या उद्योजक आस्थापनांकडे प्रशिक्षण दिले जाणार आहे त्या उद्योगांची नोंदणी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर असणे आवश्यक असेल, आस्थपना उद्योगाची स्थापना होऊन किमान तीन वर्ष पूर्ण झोलेली असावीत. आस्थापना /उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी.
या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना / उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय आस्थापना / उद्योग यामध्ये मंजूर पदांच्या 5 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून उद्योग व रोजगार उमेदवार यांच्यामध्ये दुवा साधला जावून तरुण युवक युवतींना रोजगार मिळेल. उद्योजकांना मनुष्यबळ प्राप्त होऊन उद्योगांचा विकास व बेरोजगारी संपविण्यास ही योजना महत्तवपूर्ण भूमिका पार पाडेल.