*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तृप्तता*
〰️〰️〰️
झरझर झरता पाऊसधारा
बरसात आठवणींची होते
ओसंडणाऱ्या जलदातुनी
भावप्रिती अलवार पाझरते….
हिरवळलेली हिरवाई सुंदर
चैतन्याला , सजवीत जाते
सप्तसुरांची , सुरेल मैफिल
बोल काळजाचे गात रहाते….
शब्दसरींची अवीट सुरावट
मनमनांतरा , भुलवित जाते
रिमझिम रिमझिमता पाऊस
बरसात , आठवणींची होते….
सभोवती ते दृष्टांत लाघवी
वर्षा मनास चिंब भिजविते
घनमेघनांचे अमोघ सोहळे
पाहूनी जीवन हे तृप्त होते….
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*रचना:१४१
*#©️वि.ग.सातपुते.( भावकवी )*
*📞 ( 9766544908 )*