You are currently viewing बार्टी तर्फे मालवणमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन…

बार्टी तर्फे मालवणमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन…

मालवण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्या समतादूत प्रकल्पाच्यावतीने बांगीवाडा समाजमंदिर येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या चारुशीला देऊलकर, कौटुंबिक सल्ला केंद्राचे समुपदेशक मनोज गिरकर, फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते पी. के. चौकेकर, उमेश मांजरेकर, वैभव वळंजू, राहुल जाधव सिद्धेश आचरेकर, अमित खोत, एस. एस. कासले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा