You are currently viewing कुडाळ इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल मध्ये वन महोत्सव उत्साहात साजरा 

कुडाळ इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल मध्ये वन महोत्सव उत्साहात साजरा 

कुडाळ :

क. म. शि. प्र. मंडळ इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळ कुडाळ येथे दिनांक 1 जुलै ते 8 जुलै पर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. दि. 1 जुलै ला प्रशालेतील शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व समजावून सांगितले. दि. 2 जुलै ला बीजारोपण कसे होते याच्या प्रात्यक्षिक करण्यासाठीं विद्यार्थ्यांनी आपल्या घरून कुंडीतून माती आणली व त्या मातीमध्ये विद्यार्थ्यांनी आणलेल्या विविध बिया मातीमध्ये टाकण्यात आल्या.

दि. 3 जुलै ला विद्यार्थ्यांनी झाडाविषयी घोष वाक्य तयार करून त्याचे सादरीकरण करण्यात आले. तसेच लहान मुलांनी आजच्या काळात झाडे किती महत्त्वाची आहेत या विषयावर सुंदर असे नृत्य सादर केले. दि. 4 जुलै पानांचे ठसे घेऊन ते तसे पेपर वर विविध प्रकारच्या माध्यमातून आकर्षक चित्रे विद्यार्थ्यांनी तयार केली. तसेच विविध पानांचे कोलाज तयार करून आकर्षक अशी कलाकुसर विद्यार्थ्यांनी तयार केली. दि. 5 जुलै रोजी वृक्षदिंडी काढण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सुंदररित्या सक्रिय सहभाग घेतला. वृक्षदिंडी साठी विद्यार्थ्यांनी घोषवाक्य तयार केली तसेच विविध झाडे सुद्धा या वृक्षदिंडीमध्ये पाहायला मिळाली.दि. 6 जुलै रोजी विद्यार्थ्यानी प्रशालेच्या परिसरात विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. दिनांक आठ जुलै रोजी विद्यार्थ्यांनी या वन महोत्सवा दरम्यान त्यांना मिळालेला अनुभव लिखित स्वरूपात सादर केला.

सदर वन महोत्सव आयोजित करण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. मुमताज शेख मॅडम यांनी उत्कृष्ट प्रकारे नियोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा