You are currently viewing अशी यावी कविता

अशी यावी कविता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*🎻अशी यावी कविता*🎻

 

*कविता अशी यावी

मी सहज गुणगुणावी….

 

भावनेतून आशयास

**ती हळूच उलगडावी….

 

क्लिष्ट नको रचना

नितळ झुळझुळावी….

 

सौंदर्य रूप सात्विक

ती मनमोहिनी असावी….

 

काळजाचा ठाव घ्यावा

जखम ती भळभळावी…

 

शब्दातून घालता फुंकर

अलवारपणे हुळहुळावी..

.

गीत गाता कवितेचे

डोळ्यात सजल व्हावी…

 

तुडुंबलेले भावकिनारे

कपोलावरून ओघळावी…..

 

विसरावे भान किंचित

अशी कविता यावी…..!!

 

~~~°~~~•~~~°~~~•~

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा