वेंगुर्ले :
सन २०२४ या वर्षांत “खेलो इंडिया खेलो” अंतर्गत बॅडमिंटन खेळामध्ये गोवा राज्यात १३ वर्षाखालील गटात निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सक्षम म्हापुसकर चा सत्कार तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देवुन करण्यात आला.
वेंगुर्ले शहरातील शाळा नंबर ३ मध्ये शिकत असलेला सक्षम म्हापुसकर या विद्यार्थ्याने सन २०२२ व २०२३ या सलग दोन वर्षांत ११ वर्षा खालील वयोगटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन प्रथम येण्याचा मान मिळविला. तर आता २०२४ मध्ये “खेलो ईंडीया खेलो” अंतर्गत गोवा राज्यात १३ वर्षाखालील गटात निवड झाली असून लवकरच पणजी येथील कांपाल इंडोर स्टेडियम मध्ये प्रशिक्षणासाठी सहभागी होणार आहे.
युवकांच्या उज्वल भवितव्यासाठी पंतप्रधान मान.नरेंद्र मोदीजींनी २०१४ साली प्रथम पंतप्रधान झाल्यापासून युवकांच्या कल्याणावर विशेष लक्ष दिले. भारत हा युवकांचा देश आहे. युवाशक्तीच्या जोरावर भारत विकसित राष्ट्र होवु शकतो हे ओळखून योग्य धोरण, पायाभूत सुविधा, पोषक वातावरण, संधीची उपलब्धता निर्माण करण्याचे काम केले. मोदी सरकारने क्रिडा सुविधांच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून, क्रीडा क्षेत्रासाठी पोषक वातावरण तयार केले. याचे चांगले परिणाम ऑलिंपिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या उंचावलेल्या कामगिरीच्या स्वरूपात दिसत आहेत. देशातील कोट्यावधी युवक युवतींच्या आशा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत फार मोठे काम केले आहे.
खेलो इंडियामुळे प्रशिक्षण सुविधा किफायतशीर आणि घराजवळ उपलब्ध झाल्या आहेत. खेलो इंडिया युवा आणि विद्यापीठ स्पर्धांच्या माध्यमातून तळागाळात प्रत्येक स्तरावर प्रतिभावंतांचा विकास होत आहे. शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदतीने खेळाडुंना आर्थिक अडचणीशिवाय प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम बनवले आहे. आता खेलो इंडिया केंद्रांवर १९५०० हुन अधिक खेळाडुंना माजी दिग्गज खेळाडु प्रशिक्षण देत आहेत.
प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या “कपिला – मिथिला” या शासकीय निवासस्थान येथे रहात असलेल्या सक्षम म्हापुसकर याच्या घरी सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, बुथ प्रमुख शेखर काणेकर व रविंद्र शिरसाठ तसेच म्हापुसकर कुटुंब उपस्थित होते.