You are currently viewing अंगणवाडी ताई आणि सेविका यासाठी खुल्या निबंध लेखन स्पर्धा

अंगणवाडी ताई आणि सेविका यासाठी खुल्या निबंध लेखन स्पर्धा

अंगणवाडी ताई आणि सेविका यासाठी खुल्या निबंध लेखन स्पर्धा

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच,दाभोली,वेंगुर्ला चे आयोजन

वेंगुर्ले

अंगणवाडी ताई आणि सेविका या बाल मनावर संस्कार करण्याचे कार्य करीत असतात. अगदी कमी मानधन असले तरी बाल मानसशास्त्र जपत लहानग्यांना आपलेसे करत संस्काराची शिदोरी आणि अक्षर ओळख देत प्रसंगी शासनाच्या विविध योजना राबविण्याचे ही कार्य करीत आहेत.

अशा सर्व आजी – माजी अंगणवाडी ताई आणि सेविका यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने आणि कै.गणेश

लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने खुल्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर निबंध लेखनासाठी *’ बाल संस्कार काळाची गरज ‘* हा विषय असून किमान ७०० तर कमाल १००० शब्दांमध्ये महिलांनी आपले मत सबंधित विषयावर मराठी भाषेत व्यक्त करायचं असून सोबत मुख्याध्यापक किंवा सरपंच यांचा अंगणवाडी ताई किंवा अंगणवाडी सेविका असल्याबाबत शिफारस पत्र जोडणे अनिवार्य आहे. स्पर्धेची पारितोषिक पुढील प्रमाणे: प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम, उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये १०००, ७००, ५००, २५०, २५० प्रत्येकी चित्रफ्रेम, प्रमाणपत्र आणि मेडल आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर निबंध कागदाच्या एका बाजूला स्व:हस्ताक्षरात लिहून पोस्टाने किंवा हाती वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस; द्वारा प्रा.डॉ. सचिन वासुदेव परुळकर, मु.पो.तुळस, ता:वेंगुर्ला ,जिल्हा: सिंधुदुर्ग, पिन-४१६५१५ या पत्त्यावर *दिं.१५ ऑगस्ट २०२४* पर्यंत पाठवायचे आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा