*ज्येष्ठ पत्रकार संपादक साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित लेखमाला*
*आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे:- डॉ संजय वसंत जगताप*
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पिं.चिं.साहित्य निवड समितीचे ते प्रमुख होते. एकूण ३४ साहित्यिक संस्था एकत्र आल्या होत्या. मी म सा प शाखेतर्फे साहित्य निवड समिती, सूत्र संचालन समिती, परीक्षक समिती मध्ये होतो.
डी वाय पाटील संस्थेचे मा. पी डी पाटील यांनी संमेलनाचे यजमानपद भूषविले होते. हे संमेलन न भूतो न भविष्यती झाले. या संमेलना मुळे आम्ही जवळ आलो. आम्ही दोघे पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य आहोत.
ते सासवड चे असले तरी हिंजवडी येथे स्थायिक झाले आहेत.
कवी , लेखक, निवेदक, सहसंपादक म्हणून त्यांची ओळख आहे.
मा. संजय हे एम.ए. ,एम फिल पुणे विद्यापीठाचे असून साहित्यिक व शैक्षणिक लेखनासाठी त्यांना ऑनररी डॉक्टरेट प्राप्त झाली आहे.
( सिंगापुर, इंडोनेशिया, दुबई , नेपाळ अभ्यास दौरा व आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद सहभागी सदस्य)
*सध्या कार्यरत* – विषय तज्ञ , scert राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
त्यांची प्रकाशित पुस्तके
‘आई मला जगायचंय….! ‘
मुलूखावेगळी माणसं
मी बस्तर बोलतोय ( भाषांतर )
मानवतेचे पुजारी
आम्ही जिजाऊ सावित्रीच्या वारसदार
संपादक- “शिक्षण संजीवनी वार्षिक विशेषांक”
सहसंपादक – अपेक्षा मासिक पुणे.
सहसंपादक – राष्ट्रीय हिंदी मासिक, नवी दिल्ली
निर्मिती सदस्य- जीवन शिक्षण मासिक महाराष्ट्र राज्य
स्वनिर्मित शैक्षणिक ॲप व ब्लाॕग :- “शिक्षण संजीवनी”
नवी दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून निवड व सादरीकरण ccrt
उदयपुर, राजस्थान* येथे “भारताचा नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा” कार्यशाळेत सहभाग ccrt
हैद्राबाद येथे कला सांस्कृतिक मंत्रालय आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत सक्रिय सहभाग .
भारत सरकार इन्स्पायर ॲवार्ड- विज्ञान प्रदर्शन मधे जिल्हा व राज्य राष्ट्रीय स्तरावर यशस्वी सहभाग.
‘सेव्ह द चिल्ड्रेन’ आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित जयपुर येथिल शैक्षणिक अभ्यास दौ-यात यशस्वी सहभाग.
छत्तिसगढ येथील “मी बस्तर बोलतोय” या राष्ट्रीय स्तरावरील कवी डॉ.राजाराम त्रिपाठी यांच्या काव्यसंग्रहाचा अनुवाद.
विद्या वाणी व आकाशवाणी पुणे केंद्र व वसुंधरा वाहिनी, इन्फिनिटी रेडिओ येथे काव्यवाचन.
अध्यक्ष – रौप्य महोत्सवी काव्य संमेलन अपेक्षा मासिक २०२३, अध्यक्ष राज्यस्तरीय श्रावणधारा महोत्सव २०२२, अध्यक्ष – शिक्षक जिल्हास्तरीय ऑनलाईन काव्य संमेलन २०२१
त्यांना मिळालेले काही महत्वाचे उल्लेखनीय पुरस्कार व सन्मान
आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा सिंगापूर सन्मान
आंतरराष्ट्रीय शिक्षणं परिषद इंडोनेशिया सन्मान
विश्व काव्य संमेलन सन्मान
नॕशनल इनोव्हेटिव टिचर इंडीया अवार्ड 2016
national teacher icon award – delhi
2019
national innovative teacher award 2020
“इन्स्पायर ॲवार्ड भारत सरकार” राज्य स्तर
“आई मला जगायचंय “काव्यसंग्रहास राज्यस्तरीय साहित्य साधना पुरस्कार
राज्यस्तरीय “शिक्षक प्रबोधन पुरस्कार नागपुर”
“राज्यस्तरीय संस्काररत्न पुरस्कार” – हस्ते ज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार
मराठी भाषाविश्व साहित्य पुरस्कार मुंबई –
राज्यस्तरीय “लक्ष्यझेप” पुरस्कार हस्ते ज्येष्ठ चित्रकार मंगेश तेंडुलकर.
“कुशल क्रिडा संघटक पुरस्कार “- हस्ते अर्थमंत्री जयंत पाटील.
मृत्यूंजयकार शिवाजी सावंत “ग्रामीण साहित्यिक पुरस्कार हस्ते साहित्यिक शिवाजी सावंत.
कवी जगदिश खेबुडकर यांच्या हस्ते काव्यगौरव सन्मान.
रोटरी क्लब पुणे उत्कृष्ठ शोधनिबंध सन्मान हस्ते शिक्षण सचिव.
“गुणवंत शिक्षक पुरस्कार ” हस्ते शिक्षण संचालक
“आदर्श शिक्षक पुरस्कार” लायन्स क्लब अॉफ पुणे आनंद.
विनम्र, शांत, हसतमुख स्वभावाचे मा. संजय जी यांचे व्यक्तीमत्व आकर्षून घेते.
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
9890567468