व्हॉइस ऑफ मेडिया या संघटनेतर्फे पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी आज 10 जुलै रोजी आझाद मैदानावर आंदोलन/ उपोषण
आज आपल्या पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर व्हॉइस ऑफ मेडिया या संघटनेतर्फे दिनांक 10 जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे आपल्या सर्वांच्या मागण्यांसाठी आंदोलन/ उपोषण करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर झालेला आहे,,
दिनांक 10 जुलै रोजी राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी सर्व जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष किंवा मुंबई परिसरात असलेल्या नवी मुंबई, ठाणा ,पालघर,रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आणि या जिल्ह्यातील तालुक्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राज्यातील आपली ताकद, शक्ती ,प्रभाव दाखवण्याची ही नामी संधी आहे
आपण सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप काळे साहेब यांनी केलेले आहेच,,
परंतु मला असे वाटले मी पण अशा प्रकारचे आवाहन, विनंती, आग्रह आपणास करावा कारण हे आंदोलन अंतिम टप्प्यात आलेले आहे, वाईस ऑफ मीडियाला राज्यस्तरावर , ग्रामीण भागात असलेल्या पत्रकारांना सर्व प्रकारच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठीच हे आंदोलन होत आहे आपणा सर्वांना नम्र विनंती आहे आपणा सर्वांनी या आंदोलनात उपोषणात सहभागी व्हावे
बघतात काय, सामील व्हा असे आवाहन योगेंद्र दोरकर यांनी केले आहे.